Goa Temple | Zareshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Goa Temple: फोंड्यातील झरेश्‍वर देवस्थानचा यंदा अमृतमहोत्सवी सोहळा

Goa Temple: पाच दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Temple: फोंड्यातील जुन्या बसस्थानकावरील श्री झरेश्‍वर देवस्थानचा अमृतमहोत्सवी वर्ष सोहळा यंदा भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती झरेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, यावेळी झरेश्‍वर देवस्थानचे सचिव तुकाराम नाईक तसेच दिलीप नाईक, कृष्णा शाणू नाईक, शंकर नाईक, सुरेश कवळेकर, ज्ञानेश्‍वर कवळेकर, श्रीकांत नाईक व कृष्णा नाईक आदी उपस्थित होते.

तसेच, उत्सव येत्या वर्षी 15 एप्रिल ते 18 एप्रिल असा पाच दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पहिल्या दिवशी देवस्थानात विविध धार्मिक विधी होणार असून त्यात शिवकवच जप, हवन आदी होणार आहे. दुसऱ्या दिवशी एकशे आठ बिल्वार्चन होणार आहे. या धार्मिक विधीत भाविकांना संधी दिली जाईल.

तिसऱ्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून यंदा देवस्थानला पंचाहत्तर वर्षे होत असल्याने पंचाहत्तर हजार रुपयांची पावती काढणाऱ्या दांपत्याला पूजेचे यजमानपद दिले जाईल. त्याशिवाय पाच हजारची पावती घेतलेल्या पाच दांपत्यांनाही या पूजेत सहभागी करून घेण्यात येईल.

चौथ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता मुलींसाठी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होईल. या स्पर्धेत चौदा वर्षांवरील स्पर्धक मुली सहभागी होऊ शकतात. पाचव्या दिवशी ओंकार मेलोडिज हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT