Goa Market: डिचोली-साखळी रस्त्यावरच भरतोय मासळीचा बाजार

Goa Market: रस्त्यावर मासळीचा बाजार भरत असून, भीषण अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही.
Goa Market | Fish Bazaar
Goa Market | Fish BazaarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Market: डिचोली-साखळी रस्त्यावर वाठादेव भागात सध्या मासेविक्रेत्यांनी आक्रमण केलेले आहे. या रस्त्यावरच मासळीचा बाजार भरत आहे. रस्त्यावरील मासेविक्रीमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला असून, भीषण अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही.

झांट्ये महाविद्यालय ते आरोग्यकेंद्रापर्यंतच्या रस्त्याच्या बाजूने गेल्या काही दिवसांपासून मासेविक्रीचा व्यवसाय चालत आहे. सायंकाळच्या वेळी रस्त्याच्या बाजूने विक्रेते मासळीची विक्री करताना आढळून येत आहेत. ज्या भागात मासळीचा बाजार भरतोय, तो भाग कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात येतो. या प्रकाराकडे स्थानिक पंचायतीचेही दुर्लक्ष होत आहे.

Goa Market | Fish Bazaar
Goa Tarang Utsav : पेडणेतील आगळावेगळा तरंगोत्सव

गेल्या वर्षी डिचोली शहरातील पुलाजवळील जंक्शनवर सायंकाळच्या वेळी मासळीचा बाजार भरत असे. मात्र नगरपालिकेच्या कारवाईनंतर मासेविकेत्यांना तेथून गाशा गुंडाळावा लागला होता. आता वाठादेव भागात हा बाजार भरत आहे.

वाहने रस्‍त्‍यावरच थांबवून मासे खरेदी

वाठादेव भागात रस्त्याच्या बाजूने काही परप्रांतीय महिला आणि पुरुष मासेविक्रीचा धंदा करीत आहेत. रस्त्यावर बसणाऱ्या या मासेविक्रेत्यांकडून मासळी खरेदीही जोरात चालते. रस्त्यावरुन ये-जा करणारे बरेचजण आपापली वाहने थांबवून मासे खरेदी करताना दिसून येतात.

Goa Market | Fish Bazaar
Goa Utsav: देवस्थानशी संबंधित उत्सवांत 'त्या' पदाधिकाऱ्यांकडून 'खो'

बऱ्याचदा मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी झालेली दिसून येते. रस्त्यावरील या गर्दीमुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. त्‍यामुळे संबंधित यंत्रणेने त्‍वरित पावले उचलून या मासळी विक्रेत्‍यांना तेथून उठवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Safety Goa
Goa Crime Branch Investigation
Oil Spill Road Accident Goa
 Goa land ,Environment Protection
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com