

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपराजीत असलेला एफसी गोवा संघ पुन्हा एकदा कोलकात्यातील मैदानावर वरचढ ठरणार का, या प्रश्नाचे उत्तर गुरुवारी (ता.५) मिळणार आहे. त्यांचा सामना ईस्ट बंगालविरुद्ध विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळला जाईल.
मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने २० फेब्रुवारी रोजी कोलकात्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगला २-० फरकाने पराभूत केले होते, तर गतमोसमात (२०२४-२५) त्यांनी ईस्ट बंगालला ३-२ फरकाने निसटते नमविले होते.
आता ईस्ट बंगालविरुद्ध खेळताना परिस्थिती बदलली आहे. ऑस्कर ब्रुझाँ यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगाल संघ आयएसएल स्पर्धेत परदेशी खेळाडूंच्या पूर्ण ताकदीसह खेळत असून एफसी गोवा संघाचा भर पूर्णतः भारतीय खेळाडूंवर आहे. गोव्यातील संघात फक्त दोघेच परदेशी खेळाडू आहेत.
एफसी गोवा संघाचे सध्या ३ सामन्यांतून सात गुण आहेत, तर मागील लढतीत जमशेदपूर एफसीविरुद्ध पराभूत झालेल्या ईस्ट बंगालचे तीन लढतीतून सहा गुण आहेत.
कोलकात्यास रवाना होण्यापूर्वी, पत्रकार परिषदेत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले, की ‘आमचे उद्दिष्ट प्रत्येक सामना जिंकण्याचे आहे. प्रतिस्पर्धी कोणीही असो, आम्ही पूर्ण तीन गुणांचे लक्ष्य बाळगूनच खेळतो.
ईस्ट बंगाल विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या संघांपैकी एक आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला कडवे आव्हान अपेक्षित आहे. आतापर्यंत आम्ही तीन सामन्यांतील नऊ पैकी सात गुणांची कमाई केली आहे. ही कामगिरी निश्चितच चांगली असल्याचे मी मानतो.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.