Ponda Accident Dainik Gomantak
गोवा

Ponda Accident: केरयान खांडेपार येथे प्रवासी बसला अपघात, तिघे प्रवासी किरकोळ जखमी

जखमींना उपचारासाठी फोंडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Ganeshprasad Gogate

Ponda Accident: गोव्यात सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून फोंड्याकडे निघालेल्या एका प्रवासी बसला अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. डिचोलीहून ही बस प्रवासी घेऊन फोंड्याला येत होती.

केरयान खांडेपार येथे आल्यावर बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यालगतच्या छोट्याश्या खंदकात कलंडली. या घटनेत तिघे प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी फोंडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याघटनेचा पंचनामा करण्यात आला कि नाही या संबंधी माहिती प्राप्त झाली नाही.

दरम्यान मंगळवारी रात्री साखळी-हाऊसिंग बोर्ड नजीक भरधाव कारने बुलेटसह अन्य एका दुचाकीला धडक दिल्‍याने पोस्तवाडा-होंडा येथील गिजीमोल नायर (45) या महिलेचा मृत्‍यू झाला; तर दोन दुचाकीस्‍वार जखमी झाल्याची घटना घडली. तर सोमवारी मध्यरात्री पर्वरीत एका थार कारने दुचाकीला फरफटत नेल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT