गोव्यात चर्चा तर होणारच! कारण मॅच जिंकणाऱ्या फुटबॉल संघाला मिळणारं 'हे' बक्षीस तर बघा; तुम्ही देखील चर्चा कराल...

गोव्यात कामानिमित्त झारखंड येथील काही युवा वर्ग स्थायिक झाला असून आपल्या विरंगुळ्यासाठी त्यांनी फ़ुटबाँल मॅच ठेवल्या आहेत.
Football Match
Football Match Dainik Gomantak
Published on
Updated on

Football Match At Sanguem तुम्ही या अगोदर फ़ुटबाँलचे कित्येक सामने पहिले असतील. सर्वसाधारणपणे जिंकलेल्या संघाला मिळणारी भली मोठी ट्रॉफी किंवा मिळणारी एखादी खास भेटवस्तूही पहिली असेल.

पण मडगाव- सांगे येथील ग्राऊंडवर एक आगळा वेगळा फुटबॉलचा सामना सध्या खेळवला जात असून या सामन्यासाठी जे बक्षीस ठेवलं गेलंय त्याची चर्चा सध्या गोव्यात जोरदार सुरु आहे.

Football Match
मुंबई- गोवा खड्ड्यांचा हायवे; महाराष्ट्रात राजकारण तापले, मनसेनं कंपनीचं कार्यालय फोडलं

त्याचं झालंय असं की, गोव्यात कामानिमित्त झारखंड येथील काही युवा वर्ग स्थायिक झाला असून आपल्या विरंगुळ्यासाठी त्यांनी फ़ुटबाँल मॅच ठेवल्या आहेत. आता मॅच म्हटलं की जिंकणं -हरणं आणि जिंकलेल्या संघाला ट्रॉफी देणं आलंच.

या आयोजकांनी सामन्यात जिंकलेल्या संघाला ट्रॉफी वगैरे न ठेवता चक्क 3 बोकड आणि उपविजेत्या संघाला 1 बोकड बक्षीस म्हणून जाहीर केलाय. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या बक्षिसाची चर्चा गोव्यात सुरु असून त्यांचे व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होताहेत.

Football Match
Leopard In Mulgao: वन विभागाच्या मोहिमेला यश; दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून याच पद्धतीने सामने खेळवले जात असल्याची माहिती संबंधित व्यक्तींनी दिली. या स्पर्धेसाठी गोव्यातील दूर दूरचे संघ सहभागी होत असून यंदा या स्पर्धेत 8 संघ सहभागी झाल्याचे सांगण्यात आलेय.

तसेच येथे येणाऱ्या प्रत्येक संघाला इडली-सांबर सारखा नाश्ता, दुपारचं जेवण अशी सोय देखील आयोजकांमार्फत करण्यात आली आहे.  हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांसहित या खेळाडूंचे कुटुंबीयही मैदानालगत बसून आनंद घेत असल्याचे त्या व्हायरल व्हिडिओमधून दिसतंय. या सर्व प्रकारांमुळे सांगे आणि या आगळ्या वेगळ्या फ़ुटबाँल सामन्याची चर्चा गोव्यात सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com