Sandip Choudhari kidnapping case Dainik Gomantak
गोवा

Goa Kidnapping: गुंगीचे इंजेक्शन दिले, चेहऱ्यावर ठोसे लगावले! अपहरण प्रकरणाचा गुंता; 'मास्क'मुळे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

Goa Ponda businessman kidnapping: अपहरण प्रकरणातील स्क्रॅप डीलर संदीप चौधरी याची पोलिसांनी सुटका केली असली तरी या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे.

Sameer Panditrao

फोंडा: अपहरण प्रकरणातील स्क्रॅप डीलर संदीप चौधरी याची पोलिसांनी सुटका केली असली तरी या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. वाटेत आपल्‍याला अपहरणकर्त्यांनी गुंगीचे इंजेक्‍शन दिले, मारहाण केली अशी जबानी त्‍याने दिली. तसेच अपहरणकर्त्यांनी तोंडावर मास्‍क लावल्‍यामुळे आपण त्‍यांना ओळखू शकलो नाही, असे सांगितल्‍याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.

काल बुधवारी ११ जून रोजी रात्री संदीप चौधरी याला बंगळुरुहून फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्‍याला खोदून विचारले तरी ‘आपण अपहरणकर्त्यांना ओळखले नाही’ असेच तो सांगत आहे. त्‍यामुळे अपहरणकर्ते हे भाडोत्री गुंड असावेत आणि त्यांना कुणीतरी संदीप याचे अपहरण करण्याची सुपारी दिली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

संदीप चौधरी याचे गेल्या मंगळवारी अपहरण झाले होते. त्‍या कारगाडीत चालकासह एकूण चौघेजण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. संदीप चौधरीला घेऊन हे अपहरणकर्ते मोले-अनमोडमार्गे बंगळुरुला पोचले. वाटेत त्यांनी संदीपला गुंगीचे इंजेक्शन दिले. तसेच त्याच्या चेहऱ्यावर ठोसे लगावले. त्‍यामुळे आपण जखमी झालो, असे संदीपने पोलिसांना सांगितले.

अन्‌ अपहरणकर्त्यांनीही काढला पळ

संदीप चौधरी तावडीतून सुटून पळाल्‍याने त्या अपहरणकर्त्यांनीही पळ काढला. मात्र त्‍या सर्वांनी आपापला चेहरा मास्कने झाकल्यामुळे आपण त्‍यांना ओळखू शकलो नाही असे संदीप चौधरी सांगतो.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्यासमोर त्‍याची जबानी घेण्‍यात आली. फोंडा पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

कारची नंबर प्लेट बदलल्याचा संशय

गोवा ते बंगळुरूदरम्यान अपहरणकर्त्यांनी कारगाडीची नंबर प्लेट बदलल्याचा संशय आहे. बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे संदीप अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटला. त्याने तेथील एका हॉटेलमधून आपल्या मित्राला फोन केला. त्या मित्राने फोंडा पोलिसांना कळवल्यानंतर बंगळुरुला पोचलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि गोवा गाठले.

फोंड्यात उलटसुलट प्रतिक्रिया

पैशांच्या देवघेवीतून हे अपहरणनाट्य घडले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत असून उलटसुलट प्रतिक्रियाही फोंड्यात व्यक्त होत आहेत. त्यामुळे नेमका प्रकार काय?, या अपहरणामागे कोणाचा हात आहे? की हा काही वेगळा प्रकार आहे? असे अनेक प्रश्‍‍न पोलिसांना सतावत आहेत.

पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयनाथ कवळेकर पुढील तपास करत आहेत. दरम्‍यान, फोंडा पोलिसांच्‍या कामगिरीचे फोंड्यात कौतुक करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT