Yuri Alemao Criticized Sawant Government Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गरीबांचे हक्क मारुन उद्योगपतींसाठी काम करतयं सावंत सरकार; युरी आलेमाव यांची घणाघाती टीका

Yuri Alemao Criticized Sawant Government: गरिबांचे हक्क त्यांना देण्याऐवजी उद्योगपतींना अधिकाधिक फायदा करून देणारे हे सरकार आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार विविध सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ही यंत्रणा तसेच काही मंत्री हे सरकारचे पिंजऱ्यातील पोपट बनले आहेत. ते अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागासवर्गीयांना लक्ष्य बनवून अन्याय करत आहेत. गरिबांचे हक्क त्यांना देण्याऐवजी उद्योगपतींना अधिकाधिक फायदा करून देणारे हे सरकार आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज केले.

पणजीत काँग्रेसतर्फे (Congress) आयोजित संविधान रक्षक अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. वेळोवेळी स्वार्थासाठी संविधानात दुरुस्त्या केल्या आहेत. अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीयांना त्यांचे हक्क मिळविण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. त्यामुळे देशात तसेच राज्यातील असमानता तसेच मतभेद हे दूर करण्यासाठी घटनेचे संरक्षण करण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली गेली आहे.

देशात तसेच राज्यात सुडाचे राजकारण केले जात आहे. देशात विरोधीमुक्त भारत करण्याचा या केंद्र सरकारचा संकल्प आहे. घटनेत सभापती हे पद स्वतंत्र असूनही काही सभापती सरकारचे पोपट बनले आहेत. त्यांना घटनेत दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत. फुटीर आमदारांना ‘क्लिन चीट’ दिली जाते. त्यामुळे घटनेतील अधिकारांचा सुयोग्यपणे वापर होत नाही. त्यामध्ये आता राजकारण (Politics) केले जात आहे, अशी टीका आलेमाव यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

SCROLL FOR NEXT