Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: विरोधकांच्‍या युतीचे भिजत घोंगडे कायम! काँग्रेसची होणार बैठक; मनोज परब, वीरेश बोरकर यांच्‍या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्‍‍नचिन्‍ह

Goa Politics Latest Update: येत्‍या २० डिसेंबरला होणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या तीन पक्षांतील युतीचे घोंगडे अजूनही भिजतच आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: येत्‍या २० डिसेंबरला होणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या तीन पक्षांतील युतीचे घोंगडे अजूनही भिजतच आहे.

युतीबाबत तिन्‍हीही पक्षांकडून स्‍पष्‍ट संकेत मिळत नसतानाच काँग्रेसची यासंदर्भातील महत्त्‍वपूर्ण बैठक सोमवारी होणार असतानाच, आरजीपीचे अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर रविवारी रात्रीच दिल्लीत पोहोचल्‍याने आणि ते तेथे कुणाची भेट घेणार, हे स्‍पष्‍ट न झाल्‍याने युतीबाबत पुन्‍हा संभ्रम पसरलेला आहे.

राज्‍यात दोन आमदार असलेल्‍या आम आदमी पक्षाने (आप) माघार घेतल्‍यानंतर गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षांची युती घडवून आणून भाजपचा जिल्‍हा पंचायत निवडणुकीत पराभव करण्‍याचा चंग बांधला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आरजीपी अध्‍यक्ष मनोज परब यांनीही त्‍यांना पाठिंबा दिला. काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांच्‍या मान्‍यतेनंतर युतीबाबतच्‍या चर्चा पुढे जाण्‍याची शक्‍यता असतानाच, २०१९ मध्‍ये काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आलेल्‍या आणि त्‍यानंतर इतर नऊ आमदारांसोबत भाजपात प्रवेश केलेल्‍या काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांना गोवा फॉरवर्डने पक्षप्रवेश दिला. त्‍यामुळे काँग्रेस आणि आरजीपीच्‍या नेत्‍यांकडून कमालीची नाराजी व्‍यक्त करण्‍यात आली आहे.

आजच्‍या बैठकीत युतीबाबत फैसला : ठाकरे

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या दोन पक्षांसोबतच्‍या युतीबाबत निर्णय घेण्‍यासाठी काँग्रेसने स्‍थापन केलेल्‍या प्रभारी माणिकराव ठाकरे, अमित पाटकर, युरी आलेमाव, अखिल भारतीय काँग्रेसचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर, वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष एम. के. शेख, आमदार कार्लुस फेरेरा आणि एल्‍टन डिकॉस्‍टा या सात जणांच्‍या समितीची बैठक सोमवारी पणजीत होणार आहे.

या बैठकीत गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीसोबतची युती आणि इजिदोर फर्नांडिस यांच्‍या गोवा फॉरवर्डमधील प्रवेशाबाबत चर्चा करण्‍यात येईल. त्‍यानंतरच इतर दोन पक्षांच्‍या प्रमुखांना युतीबाबतच्‍या बैठकीसाठी बोलावण्‍यात येईल, अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

मनोज, वीरेशच्‍या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्‍‍नचिन्‍ह

काँग्रेससोबत युती करण्‍यास तयार असलेले आरजीपीचे अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर रविवारी रात्री दिल्लीत पोहोचले. युतीबाबत चर्चा करण्‍यासाठीच आम्‍ही दिल्लीला आल्‍याचे परब यांनी सांगितले. परंतु, चर्चा काँग्रेस नेत्‍यांशी होणार की आणखी कोणाशी? हे सांगण्‍यास त्‍यांनी नकार दर्शवल्‍याने आरजीपीच्‍या भूमिकेबाबत प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसारच दिल्‍या गेल्या! 'कॅश फॉर जॉब' आरोपांना चौकशी अहवालानंतर उत्तर, ढवळीकरांचं स्‍पष्‍टीकरण

91.45% गोमंतकीयांचा टेलिफोनला 'बाय बाय'! वापरकर्त्यांची संख्‍या 1.32,261 वरून 11,314

IFFI 2025: इफ्फीत 'फॅशन शो'मधून हस्तकलेचा ग्लॅमरस प्रचार! महाराष्ट्रीयन अभिनेत्री सायली पाटीलसह दिग्गज मॉडेल्स उतरल्या रॅम्पवर

Baina Robbery Case: पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे, 6 दिवस उलटूनही बायणा येथील सशस्त्र दरोड्याचा तपास लागेना

Horoscope: तणाव कमी होऊन मन शांत होईल, नोकरीत बदल होणार; वाचा काय सांगतंय तुमचं भविष्य?

SCROLL FOR NEXT