Goa Revenue: स्‍टँप ड्युटीतून मिळणाऱ्या महसुलात घट! अहवालातील आकडेवारीतून उघड; GST वरील करांत मात्र वर्षभरात वाढ

Goa Government Revenue: राज्‍याच्‍या उत्‍पन्‍न आणि खर्चावरील तसेच वस्‍तू व सेवांवरील (जीएसटी) करांत एका वर्षात वाढ झाली असली, तरी मालमत्ता व भांडवली करांत मात्र घट झालेली आहे.
Tax
TaxDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍याच्‍या उत्‍पन्‍न आणि खर्चावरील तसेच वस्‍तू व सेवांवरील (जीएसटी) करांत एका वर्षात वाढ झाली असली, तरी मालमत्ता व भांडवली करांत मात्र घट झालेली आहे. जमीन महसूल तसेच स्‍टँप ड्युटी आणि नोंदणीच्‍या माध्‍यमातून येणाऱ्या महसुलात घट झाल्‍याचे नियोजन, सांख्‍यिकी आणि मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातील आकडेवारीतून समोर आले आहे.

२०२३–२४ आणि २०२४–२५ या दोन वर्षांतील उत्‍पन्‍न आणि खर्च, मालमत्ता व भांडवल तसेच वस्‍तू आणि सेवा या करांबाबतची आकडेवारी अहवालातून सादर करण्‍यात आली आहे त्‍यातून उत्‍पन्‍न आणि खर्चावरील करात एका वर्षात ११५.८९ आणि तब्‍बल ४४४ कोटींची वाढ झाल्‍याचे दिसते.

परंतु, मालमत्ता आणि भांडवली करांत मात्र ३२.२४ कोटींची घट झाल्‍याचे दिसून येते. मालमत्ता आणि भांडवली कराच्‍या माध्‍यमातून २०२३–२४ मध्‍ये राज्‍य सरकारला १,३७३.९४ कोटींचा महसूल मिळाला होता. पण, २०२४–२५ मध्‍ये त्‍यात ३२.२४ कोटींची घट होऊन यावर्षी हा महसूल १,३४१.७० कोटी इतका मिळाला.

Tax
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील आजच्या इंधनाच्या किमतीत किरकोळ बदल; वाचा पेट्रोल-डिझेलचे दर

मालमत्ता आणि भांडवली करात महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या स्‍टँप ड्युटी आणि नोंदणीच्‍या माध्‍यमातून २०२३–२४ मध्‍ये सरकारला १,२४६.८२ कोटींचा महसूल प्राप्‍त झाला होता. पण, २०२४–२५ मध्‍ये त्‍यात १८.४८ कोटींची घट होऊन हा महसूल १,२२८.३४ कोटींवर आला. तर, २०२३–२४ मध्‍ये जमीन महसुलाच्‍या माध्‍यमातून सरकारला १२७.११ कोटी मिळाले होते. पण, पुढील वर्षी त्‍यात १३.०७ कोटींची घट होऊन त्‍यावर्षी सरकारला ११३.४१ कोटींचा महसूल मिळाल्‍याचे अहवाल सांगतो.

Tax
Poll Duty Officers Arrested In Goa: निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्याने उकळले 16 लाख; गोव्यात दोन लुटारू अधिकाऱ्यांना अटक

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क वाढले

२०२३–२४ च्‍या तुलनेत २०२४–२५ मध्‍ये राज्‍य उत्‍पादन शुल्‍कात ७७.०६ कोटींनी वाढ झाली. पण, केंद्रीय उत्‍पादन शुल्‍कात मात्र ९.६६ कोटींनी घट झाल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते. २०२३–२४ मध्‍ये राज्‍याला केंद्रीय उत्‍पादन शुल्‍कातून ५७.८२ कोटी मिळाले होते. २०२४–२५ मध्‍ये हा आकडा ४८.१६ कोटी झाला. तर, राज्‍य उत्‍पादन शुल्‍कातून २०२३–२४ मध्‍ये ९००.०६ कोटी मिळाले होते, हा आकडा २०२४–२५ मध्‍ये ९७७.१२ कोटी झाल्‍याचेही आकडेवारीतून स्‍पष्‍ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com