Goa Politics : Aam Adami Party  Dainik gomantak
गोवा

'आप'ला या आश्वासनांच्या नौकेचा आधार

गोयंकरांनी आपल्याला एकमेव पर्याय म्हणून स्वीकारले आहे..

दैनिक गोमन्तक

राज्यात (Goa) सध्या राजकीय वातावरण तापले असून, राजकीय घडामोडींना भलताच वेग आलेला दिसून येत आहे. राज्यातील अनेकांनी आपमध्ये (AAP Party) प्रवेश केला असून, गोवा मायनिंग पिपल फ्रन्टचे (जीएमपीएफ) समन्वयक पुती गावकर यांनी काल ‘आप’ पक्षात प्रवेश केला(Goa Politics) ; दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी "मी गोव्याच्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो आणि गोव्याच्या भविष्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

" असे ट्वीट करत पक्षात नवीन सामील झालेल्या सदस्यांचे स्वागत केले. गोयंकरांनी आपला एकमेव पर्याय म्हणून स्वीकारले आहे आणि ते मोठ्या संख्येने पक्षात सामील होत आहेत असे त्यांनी मत व्यक्त केले.

दरम्यान, 'दिल्लीप्रमाणेच गोव्यातही विकासकामे येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत. राज्याच्या विकासासाठी सर्व समुदाय आप- आपला कार्यभाग उचलतील. त्याचबरोबर काही मुद्दे मांडण्यात आले आहेत, ज्यावर आपण सर्वजण मिळून चर्चा करुयात. तसेच काही दिवसातच गोमंतक भंडारी समाजाला आमचा निर्णयही कळवू,असंही यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आप ने दिलेली आश्वासने...

दरम्यान नुकत्याच सात्तरी तालुक्यातील करमाळी बुद्रुक येथे झालेल्या सभेत "गोव्यात सरकार स्थापन केल्यानंतर 6 महिन्यांत लोकांना त्यांचे जमिनीचे हक्क मिळवून देण्याचे आश्वासन" त्यांनी ग्रामस्थांना दिले.

याचबरोबर राज्यात खाणींचा प्रश्न एरणीवर आहे. या व्यवसायावर अवंलबून असणाऱ्यांचे रोजगार गेले आहेत. अनेकांचे संसार संकटात सापडले आहेत. गोव्यात ‘आप’चे सरकार आल्यास आम्ही अवघ्या सहा महिन्यात खाण व्यवसाय सुरू करणार आहो, असे केजरीवाल म्हणाले. याव्यतिरिक्त आम्ही दिल्लीतील सरकारी शाळांची परिस्थिती इतकी सुधारली आहे की, खाजगी शाळांचे विद्यार्थीही तिथे जातात. आम्ही गोव्यातील प्रत्येक गावात अशा शाळा बांधू: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोरीम विधानसभा मतदारसंघातील मौसी ग्रामस्थांशी संवाद साधला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT