Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

Laxmikant Parsekar: रस्त्यांचे राष्ट्रीयीकरण होऊ शकते तर नद्यांचे का नाही? लक्ष्मीकांत पार्सेकरांचा सवाल

Goa Politics: गोव्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात झाला होता.

Manish Jadhav

गोव्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात झाला होता. त्यासंदर्भात विचारले असता पार्सेकर म्हणाले की, रस्ता वाहतुकीला पर्याय म्हणून नद्यांमधून जलमार्ग होण्यासाठी राष्‍ट्रीयीकरणाची गरज आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, तसेच प्रवास खर्चही स्वस्त होऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाला आपला पाठिंबा आहे. रस्त्यांचे राष्ट्रीयीकरण होऊ शकते, तर नद्यांचे का नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन रुपांतरण सुरु आहे, यासंदर्भात पार्सेकर म्हणाले की, विद्यमान आमदारांनी याबाबत विचार करायला हवा. ते मतदारसंघाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. लोकांना जे हवे आहे ते करणार आहेत तर मग आमदाराची गरज काय असा प्रश्‍न त्यांनी केला.

अनेक प्रकल्प माझ्या कार्यकाळात झाले...

पेडणे तालुक्यात अनेक प्रकल्प माझ्या कार्यकाळात आणले होते. तुये तेथील इस्पितळ, तेरखोल पूल तसेच इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी जागा घेण्यात आली आहे. मात्र, हे प्रकल्प अजूनही सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्थानिक लोक नाराज आहेत. तेरखोल पुलाचा फायदा तेथे राहात असलेल्या लोकांना झाला असता. मात्र, हे लोक पुलाअभावी वंचित आहेत. इलेक्ट्रॉनिक सिटी झाली असती, तर स्थानिकांना रोजगार मिळाला असता. लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांनी या प्रकल्पाचे काम पुढे नेण्याची गरज आहे, असे पार्सेकर म्हणाले.

राजकीय क्षेत्रातून बाहेर पडलो नाही!

मी राजकीय क्षेत्रातून बाहेर पडलो किंवा राजकारणाचा राजीनामा दिला असे कधीच म्हटलेले नाही. मी आजही राजकारणात सक्रिय आहे. भाजपचे नेते मला भेटतात व त्यांच्याशी माझाही संपर्क असतो. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे आपल्या घरी येतात. मागील विधानसभा निवडणुकीत मी जिंकणार नसल्याने भाजपने मला तिकीट नाकारले. ऐनवेळी भाजपने हा निर्णय घेतल्याने मला अपक्ष राहण्यापासून पर्याय नव्हता. त्यामुळे मी निवडणूक लढविली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT