मडगाव: भाजप सरकार (BJP Government) देशात जे काही घडले ते 2014 नंतरच अशा भ्रमात राहुन, ऐतिहासीक स्थळे व खुणा नष्ट करीत आहे. मडगावच्या ऐतिहासीक लोहिया मैदानाला आज भेट दिल्यानंतर तेथिल डॉ. राम मनोहर लोहियांचा (Dr. Ram Manohar Lohia) पुतळा व हुतात्मा स्मारक गायब झाल्याचे पाहुन मला धक्काच बसला. या घटनेने भाजपचे बेगडी देशप्रेम परत एकदा उघडे पडले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी त्वरित या घटनेची दखल घेवुन सदर पुतळा व स्मारक शोधुन काढण्याचे आदेश द्यावेत व ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली आहे.
विरोधी पक्ष नेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आज काही वर्तमानपत्रात डॉ. लोहियांचा पुतळा व हुतात्मा स्मारक लोहिया मैदानावर उघड्यावर ठेवले असल्यासंबंधी आलेल्या बातमीची दखल घेवुन लोहिया मैदानावर प्रत्यक्ष भेट देवुन पाहणी केली. परंतु, तेथुन पुतळा व स्मारक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दिगंबर कामत यांनी ताबडतोब नगरपालीका अभियंता डिनीज डिमेलो व कनिष्ट अभियंता विराज बोडनेकर यांना बोलावुन घेतले व सदर पुतळा व हुतात्मा स्मारकाचा ठावठिकाणा शोधण्याचे स्पष्ट आदेश दिले. सरकारने सदर पुतळा व स्मारक सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याचे दिगंबर कामत म्हणाले.
सरकारच्या पुरातत्व खात्याने अशा ऐतिहासीक स्थळांची व तेथे असलेले पुतळे, स्मारके, नामफलक यांची दखल घेणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच गोवा मुक्तीसाठी योगदान व सर्वस्व दिलेल्या स्वातंत्र्यसैनीकां प्रती तसेच त्यांच्या कुटूंबियांप्रती भाजप सरकारला आदर नसल्याचे परत एकदा स्पष्ट झाले आहे.
गोव्याचा 60 वा मुक्ती दिन साजरा करताना 19 डिसेंबर 2020 रोजी सरकारने स्वातंत्र्यसैनीकांना सदर सोहळ्याचे साधे निमंत्रण दिले नव्हते याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली. आमचे नेते राहुल गांधी यांनी परवाच जालियानवाला बाग (Jallianwala Bagh) येथे भाजप सरकारने सौदर्यीकरणाच्या नावाने तेथिल ऐतिहासीक खुणाच नष्ट केल्याच्या घटनेचा पर्दाफाश केला होता असे सांगुन, भाजपला देशासाठी बलिदान दिलेल्यांप्रती कसलाच आदर नसल्याचा घणाघाती आरोप दिगंबर कामत यांनी केला. भाजप केवळ उत्सव साजरे करुन राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले.
मडगावच्या ऐतिहासीक लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण लवकरात लवकर पुर्ण करुन, 19 डिसेंबर 2021 रोजी गोवा मुक्तीची 60 वर्षे साजरी करताना देशप्रेमीना तेथे आदरांजली वाहण्याची संधी देणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारने संथगतीने चाललेल्या या कामाला आता गती देणे गरजेचे आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.