Goa BJP: राज्यातील कुरबुरी शहांच्‍या कानावर

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपमधील अंतर्गत कलहाची कल्‍पना अमित शहा यांना दिली
Goa CM Pramod Sawant meets Union Home Minster AmitShah in Hubli
Goa CM Pramod Sawant meets Union Home Minster AmitShah in Hubli Twitter/ @DrPramodPSawant
Published on
Updated on

पणजी: राज्यातील (Goa) भाजपच्या (BJP) अंतर्गत कुरबुरी अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या कानावर पडल्या. एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) काल सायंकाळी हुबळीत होते. शहा हेसुद्धा हुबळीत होते. तेथे एका हॉटेलमध्‍ये या दोघांची भेट झाली.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या राजकीय परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांनी सर्व काही शहा यांना सांगून टाकले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय काय घडू शकते याचा अंदाजही त्यांनी शहा यांना दिला. भाजपला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर लढावे लागले आणि बंडाळी झालीच तर पूर्ण बहुमताचे लक्ष्य गाठणे किती अवघड बनेल याचे राजकीय चित्र या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शहा यांच्यासमोर ठेवले.

Goa CM Pramod Sawant meets Union Home Minster AmitShah in Hubli
Goa Election: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे युतीचे प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यादरम्यानचे राजकीय निरीक्षणही यावेळी सादर केले. शहा यांनी काही नेत्यांविषयी मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडून दगाफटका होण्याची शक्यताही यादरम्यान त्यांनी आजमावून पाहिली. त्यामुळे गणेश चतुर्थीनंतर हे सारे प्रश्न सोडवण्यासाठी शहा यांच्या थेट निरीक्षणाखाली प्रयत्न सुरु केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. शहा हेही एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये आलेल्या 12 आमदारांच्या मतदारसंघांतील राजकीय स्थिती, मागच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्‍या 13 जागांमध्‍ये यावेळी किती भर पडू शकते, युती केली तर काय आणि नाही केली तर काय होऊ शकते असेही मुद्दे मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी जाणून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Goa CM Pramod Sawant meets Union Home Minster AmitShah in Hubli
Goa: मुख्यमंत्र्यांचा उद्या शिरोडा मतदारसंघ दौरा

या भेटीदरम्यान पी. चिदंबरम यांची वरिष्ठ निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसने सुरु केलेली मोहीम, नेत्यांची आयात, भाजपविरोधी आघाडीसाठी होणारे प्रयत्न, मगोच्या नेत्यांची भूमिका, आम आदमी पक्षाचे राजकारण असे मुद्देही चर्चेला आले. राज्य सरकारने ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेला दिलेली गती, प्रकल्प पूर्ण करण्याचे केलेले नियोजन, सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सरकारी व संघटनात्मक पातळीवर चाललेले प्रयत्न याची माहिती मुख्यमंत्र्यांनी शहा यांना दिली. या भेटीनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री गोव्यात दाखल झाले.

"केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज हुबळीत भेटलो. यावेळी राज्यातील राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राजकारण जसे सुरु आहे तसे त्यांच्यासमोर मी मांडले आहे."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com