CM Pramod Sawant Meet PM Modi Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

CM Pramod Sawant Meet PM Modi: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (20 ऑगस्ट) जीएसटी परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. या निमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

Manish Jadhav

पणजी: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (20 ऑगस्ट) जीएसटी परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. या निमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी राज्याच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिंमंडळ विस्ताराचा मुहूर्त देखील ठरला. उद्या म्हणजेच गुरुवारी (21 ऑगस्ट) रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जीएसटी आणि राज्याच्या विकासावर चर्चा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जीएसटी (GST) परिषदेच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी गोव्याच्या आर्थिक स्थिती आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा केली. गोव्याचे अर्थकारण पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे, या क्षेत्रावरील जीएसटीचा परिणाम आणि राज्याच्या महसुलावर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा झाल्याचे मानले जाते.

याशिवाय, राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रगती आणि केंद्राकडून आवश्यक असलेल्या निधीबाबतही त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यातील हा संवाद केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या चांगल्या समन्वयाचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

तवडकर आणि कामतांच्या मंत्रिपदाची माळ!

दुसरीकडे, वर्षभर या-ना त्या कारणाने पुढे ढकलला गेलेला मंत्रिमंडळ फेरबदल करण्‍यास अखेर मुहूर्त नक्‍की झाला. विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्‍यासह मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचा समावेश मंत्रिमंडळात नक्‍की मानला जात आहे. तवडकर आणि कामत उद्या, गुरुवारी दुपारी 12 वाजता शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दुसरीकडे, अन्य दावेदार मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश पुन्हा लांबणीवर पडेल. लोबो यांना अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीला बोलावून घेतले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या समक्ष त्यांच्याशी राजकीय चर्चाही केली होती. दिल्लीला जाण्यापूर्वी लोबो आणि आमोणकर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी बंद दाराआड केलेल्या चर्चेत काय दडले असेल याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

पंतप्रधानांना ऐतिहासिक मठाचे निमंत्रण

तसेच, या भेटीत मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ, काणकोण येथील शिष्टमंडळही उपस्थित होते. या शिष्टमंडळात मठाचे अध्यक्ष श्रीनिवास डेंपो आणि उपाध्यक्ष आर. आर. कामत यांचा समावेश होता. या प्रतिनिधींनी पंतप्रधानांना मठाच्या आगामी 550व्या वर्धापनदिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी निमंत्रण दिले.

हा मठ 13व्या शतकात जगद्गुरु माधवाचार्य यांच्या द्वैत परंपरेनुसार स्थापन झाला आहे आणि त्यामुळे या वर्धापनदिनाचे विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. शिष्टमंडळाने या ऐतिहासिक प्रसंगाला प्रोत्साहन आणि समर्थन दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे म्हटले जाते, ज्यामुळे या सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT