Akshata Chhatre
डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रभावी नेते आहेत. ते उत्तर गोव्याच्या साखळी मतदारसंघातून विधानसभेत निवडून आले
लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सक्रिय स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.
कोल्हापूर येथील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून BAMS पदवी प्राप्त केली.
त्यानंतर त्यांनी पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MSW (Master of Social Work) ही पदव्युत्तर पदवी घेतली.
राजकारणात येण्यापूर्वी ते पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर होते तसेच शेतीचीही त्यांना आवड होती.
प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द विधानसभा अध्यक्षपदापासून सुरू झाली. गोवा राज्य अवसंरचना विकास महामंडळाचे (GSIDC) अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध पायाभूत प्रकल्प राबवले.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाल्यानंतर सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.