पणजी: राज्य संयोजक पदावरून आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी उचलबांगडी केलेले ॲड. अमित पालेकर हे काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असून, लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी गुरुवारी ‘गोमन्तक’ला दिली.
राज्यात २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने पालेकर यांना सांताक्रूझ मतदारसंघाची उमेदवारी देतानाच, त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणूनही घोषित केले होते. विधानसभा निवडणुकीत भंडारी समाजाचे मतदान निर्णायक ठरेल, हे लक्षात घेऊनच ‘आप’ने पालेकरांना प्रमुख चेहरा म्हणून पुढे आणले होते. परंतु, या निवडणुकीत पालेकरांचा पराभव झाला. शिवाय निवडणुकीत पक्षाचे केवळ दोनच आमदार निवडून आले. त्यानंतर नुकतीच झालेली जिल्हा पंचायत निवडणूकही ‘आप’ने पालेकर यांच्या नेतृत्वाखाली लढवली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनी त्यांना साथही दिली. तरीही ‘आप’च्या ४२ पैकी केवळ एकच उमेदवार निवडून आला.
दरम्यान, काँग्रेसचे (Congress) मीडिया विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी ॲड. पालेकर यांचा ‘वापरा व फेका’ असा वापर ‘आप’ने केल्याचे ट्वीट केले आहे.
अमित पालेकर ‘आप’ला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा जिल्हा पंचायत निवडणुकीआधीही होत होती. त्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंतही पोहोचली होती. परंतु, पालेकर यांनी नेहमीच या चर्चांत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. आता ‘आप’ने अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर पालेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
पक्षाने, तसेच राष्ट्रीय नेत्यांनी दिलेली जबाबदारी मी पेलली; परंतु जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश निश्चित अनपेक्षित आहे. पक्षाने मला प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर केले असले तरी पक्षात काम करीत राहणार, असे ॲड. अमित पालेकर (Amit Palekar) यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.