Deepak Dhavlikar with Daughter Gauri Dainik Gomantak
गोवा

Thank You! माझ्या स्वप्नांना बळ दिलंत; गोव्यातील राजकीय नेत्याची लेक 'फर्स्ट ऑफिसर', विमानात मानले वडिलांचे आभार Watch Video

Goa Viral Video: बापलेकीच्या या भावनिक आणि अभिमानास्पद प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Pramod Yadav

पणजी: धन्यवाद! माझ्या स्वप्नांना बळ दिलं, मला हे जगं दिलंत, हे एका लेकीने बापासाठी काढलेले शब्द आहेत. प्रवासी म्हणून वडील बसलेल्या विमानात फर्स्ट ऑफिसर म्हणून सूत्र लेकीच्या हाती होती. वडिलांसोबत चेन्नईवरुन गोव्याकडे उड्डाण घेताना लेकीने फ्लाईटमध्ये उद्घोषणा केली. माझे वडील याच विमानातून प्रवास करतायेत, असे तिने अभिमानाने सांगितलं. गोव्यातल्या बाप लेकीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते दीपक ढवळीकर आणि लेक गौरी यांचा एक भावनिक आणि तितकाच कौतुकास्पद व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दीपक ढवळीकर चेन्नईतून गोव्याकडे प्रवास करत होते. इंडिगोच्या ज्या विमानातून ढवळीकर प्रवास करत होते त्या विमानाचे फर्स्ट ऑफिसर त्यांची लेक होती. गौरी ढवळीकरांनी विमानात आल्यावर उद्घोषणा करताना विमानात तिचे वडील देखील बसल्याचे माहिती देत, भावना व्यक्त केल्या.

गौरी ढवळीकरांनी विमानात प्रवाशांचे स्वागत करत, या विमानातून माझे वडील (दीपळ ढवळीकर) प्रवास करत असल्याचे सांगितले. तसेच, मला हे जगं देण्यासाठी धन्यवाद, माझी स्वप्न जगण्यास बळ देण्यासाठी धन्यवाद, अशा शब्दात गौरी वडील दीपक यांचे धन्यवाद मानले. यानंतर विमानातील सहप्रवाशांनी टाळ्यांचा कडकाडट केला. बापलेकीच्या या भावनिक आणि अभिमानास्पद प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मडगावचा आवाजचे युवा नेते प्रभव नाईक यांनी एक्सवर हा व्हिडिओ शेअर करुन गौरी ढवळीकरचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. "तिच्या संदेशातून तिने वडिलांच्या प्रेमप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच तिचा प्रवास गोव्यातील तरुणांना प्रेरणा देतील, आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याचे बळ देतील," असे नाईक यांनी म्हटले आहे.

Prabhav Naik Post

दीपक ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा भाऊ सुदीन ढवळीकर हे राज्यात सत्तेत असून, त्यांच्याकडे वीज खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT