Mopa International Airport, Goa Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : 'मोपा'ला पोलिसांचे सुरक्षा कवच; 62 पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश

11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

दैनिक गोमंतक

मोपा विमानतळ प्रकल्पाचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे विमान तळावरील उर्वरीत कामकाजाला आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोपाला पोलिसांचे सुरक्षा कवच देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे गोवा पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत.

(Goa police transfers 62 police personnel at Mopa Airport)

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यातील 62 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या मोपा विमानतळावर केल्या आहेत. यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा समावेश असून यामध्ये मोपा विमानतळ पोलीस स्टेशन आणि मोपा वाहतूक कक्ष अशी नियुक्तीची विभागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मोपावर नियुक्ती केलेल्यांमध्ये 4 पोलीस उपनिरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 21 हेड कॉन्स्टेबल, 31 पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोपा विमानतळासाठी हालचालींना आता वेग आला असल्याची स्थिती आहे. या प्रकल्पामधून सरकारला तब्बल 36 टक्के महसूल प्राप्त होणार आहे. तसेच मोपा विमानतळ गोव्यासह लगतच्या सिंधुदुर्ग, बेळगाव या भागांसाठीही वरदान ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 09 November 2024: नवीन काम हाती घेण्याच्या विचारात असाल तर आजचं भविष्य नक्कीच जाणून घ्या !!

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा लिलाव

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT