Mopa Airport : पर्यटकांच्या स्वागतासाठी मोपा विमानतळ सज्ज; 'या' तारखेपासून होणार खुलं

सरकारला मिळणार 36 टक्के अतिरिक्त महसूल; सिंधुदुर्ग, बेळगावसाठीही पूरक
Goa Airport
Goa Airport Dainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport : ‘मोपा’ या 13 व्या आंतरराष्ट्रीय ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्यक्षात हा विमानतळ पाच जानेवारी 2023 पासून कार्यरत होणार आहेत. मोपा विमानतळ गोव्यासह लगतच्या सिंधुदुर्ग, बेळगाव या भागांसाठीही वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामधून सरकारला तब्बल 36 टक्के महसूल प्राप्त होणार आहे.

या प्रकल्पासाठी पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचा त्याग केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प दिमाखात उभा राहिला आहे. हा विमानतळ तयार करताना अनेक अडचणी आल्या. परंतु राज्य सरकारने केंद्राच्या पाठबळावर त्यावर मात करत हा प्रकल्प उभा केला. येथील पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग पूर्ण झाली आहे. एकूणच विमानतळाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात शॉप स्टोअर्स तयार केले आहेत. एअर ट्रॅफिक टॉवरसह अद्यावत फायर स्टेशन आणि या सर्वांवर कंट्रोल ठेवणारी बिल्डिंगही तयार झाली आहे, अशी माहिती जीएमआर कंपनीने दिली.

Goa Airport
Goa Amona Bridge: आमोणा-खांडोळा पुलाची दुर्दशा; प्रशासन मोठा अनर्थ घडण्‍याची वाट बघतंय का?

असं आहे विमानतळ

  • 60 मीटर रुंद व साडेतीन किलोमीटर लांबीचा रनवे.

  • विमान थांबते तिथून पॅसेंजरला ने-आण करण्यासाठी ६० मीटर रुंद आणि साडेतीन किलोमीटर लांब टॅक्स रनवे.

  • विमाने पार्क करण्यासाठी भव्य पार्किंग तळ.

  • थेट विमानात पॅसेंजर ये-जा करतील ते पाच पॅसेंजर ब्रीज.

गोमंतकीय संस्कृतीची छाप

या विमानतळावर गोमंतकीय कला आणि संस्कृतीची अमीट छाप उमटला आहे. येथील इमारतीला गोमंतकीय संस्कृतीला साजेल अशी रंगरंगोटी केली आहे. प्रवाशांसाठी असलेल्या आराम कक्षात मोठी स्क्रीन बसविली आहे. त्या स्क्रीनवर गोव्यातील सर्व पर्यटनस्थळे पाहता येतील. इमारतीबाहेर सुसज्ज पटांगण तयार केले आहे. या ठिकाणी पाण्याचे आकर्षक कारंजे आहेत.

लिंक रोडचे काम युद्धपातळीवर

मोपा विमानतळासाठी आवश्यक असलेल्या लिंक रोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुकेकुळण-धारगळ ते मोपा विमानतळाकडे जाणारा लिंक उड्डाण पूल रस्ता सुमारे बाराशे कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे.

वाहतूक कोंडीचा ससेमिरा संपणार

गोव्यातील उद्योजक, व्यापारी तसेच इतर लोक सातत्याने इतर राज्यांत प्रवास करतात. दाबोळीला जाण्यासाठी किमान चार तास अगोदर घरातून बाहेर पडावे लागते. कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न. मात्र, मोपामुळे यापुढे लोकांवर वेळेचे बंधन व ताण असणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com