Goa Police: पोलिस खात्यातील 7 उपअधीक्षकांच्या बदल्यांचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला; तर 8 उपअधीक्षकांना आणखी काही विभागांचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. उत्तर गोव्याचे विशेष विभागाचे उपअधीक्षक सलिम शेख यांची वास्को उपविभागीय अधिकारीपदी, तर या जागी असलेले उपअधीक्षक राजेश कुमार यांची पेडणे उपविभागीय अधिकारपदी बदली करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही उपअधीक्षक बदल्यांच्या प्रतिक्षेत होते; मात्र अनेकांच्या पदरी निराशा आली आहे. गोवा राखीव पोलिस दलातील उपअधीक्षक रुपेंद्र शेटगावकर यांची उत्तर गोवा विशेष विभागात, पोलिस नियंत्रण कक्षाचे उपअधीक्षक रॉय परेरा यांची गोवा राखीव पोलिस दलामध्ये बदली करण्यात आली आहे.
उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपधीक्षक प्रबोध शिरवईकर यांची दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षकपदी, पेडण्याचे उपविभागीय अधिकारी सिद्धांत शिरोडकर यांची उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षकपदी, एटीएसचे उपअधीक्षक राजन निगळ्ये यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. गेली अनेक वर्षे या विभागात पोलिस निरीक्षक म्हणून काम केल्यानंतर पुन्हा त्यांची त्याच विभागात बदली झाली आहे.
वेरेकर यांच्याकडे ‘मानवी तस्करी’ विभाग
पोलिस मुख्यालय उपअधीक्षक हरिष मडकईकर यांच्याकडे पोलिस कल्याण कक्षाचा, 'एफआरआर'ओ उपअधीक्षक नूतन वेरेकर यांच्याकडे मानवी तस्करी तसेच महिला पोलिस स्थानकाचा, बिनतारी संदेश विभागाचे उपअधीक्षक राम आसरे यांच्याकडे राज्य पोलिस नियंत्रण उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला.
नार्वेकर यांच्याकडे सुरक्षा विभागाचा ताबा
मोटार वाहन कक्षाचे उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्याकडे कायदा व दक्षता तसेच निवडणूक कक्षाचा अतिरिक्त ताबा, आयआरबी कमांडंट सुदेश नार्वेकर यांच्याकडे सुरक्षा विभाग, वाहतूक पोलिस मुख्यालय उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्याकडे एटीएस विभाग व आयआरबी डेप्युटी कमांडंट पदाचा, पोलिस मुख्यालय उपअधीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्याकडे पर्यटन पोलिस व ‘डीजीपी’चे अधिकारी, किनारपट्टी सुरक्षा उपअधीक्षक संतोष देसाई यांच्याकडे कम्युनिकेशन युनिटचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.