Goa News | Sagar Ekoskar Dainik Gomantak
गोवा

Goa News: खोट्या माहितीच्या आधारे कुतिन्होंविरोधात 'लूक आऊट'

Goa News: सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: वादग्रस्त पोलिस अधिकारी सागर एकोस्कर यांच्याकडून मडगाव येथील व्यावसायिक फ्लॉईड कुतिन्हो यांना एका खोट्या प्रकरणात अडकविण्याचा जो आरोप केला जात आहे, त्याप्रकरणी एक नवी बाब उजेडात आली आहे.

कुतिन्होंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याच्या माहितीच्या आधारे त्यांच्या विरोधात केंद्रीय गुप्तचर (आयबी) खात्याने ‘लूक आऊट’ नोटीस काढली असली, तरी प्रत्यक्षात मडगाव न्यायालयाने वॉरंट जारी केलेच नव्हते, अशी माहिती ‘आरटीआय’ अंतर्गत मिळाली आहे.

तसेच, या प्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धनीया यांच्यासह सर्व पोलिस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे. सध्या कुतिन्हो हे लंडनमध्ये असून भारतातील सर्व विमानतळांवर त्यांच्या नावे ‘लूक आऊट’ नोटीस असल्याने त्यांना गोव्यात येणे शक्य होत नाही.

उपनिरीक्षक दीपेश शेटकर विरोधातही तक्रार

पोलिस उपनिरीक्षक दीपेश शेटकर यांनी न्यायालयाला आपल्या विरोधात एसआयटीने ‘लूक आऊट’ नोटीस जारी केल्याची खोटी माहिती दिली, असा आरोप कुतिन्हो यांनी केला आहे. एसआयटीचे उपअधीक्षक संतोष देसाई यांनी कुतिन्हो यांच्यावर कसलेही वॉरंट निघाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT