Central Government: गोवा राज्यातील '266' जणांना नोकऱ्यांची दिवाळी भेट!

Central Government: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
Central Government
Central Government Dainik Gomantak
Published on
Updated on

Central Government: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज देशातील 75 हजार उमेदवारांना नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे देत गिफ्ट दिले आहे. अर्थात यासाठीची रितसर परीक्षापद्धती पूर्ण पार पाडण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील 266 उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, यातील 25 जणांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. 266 पैकी 204 उमेदवारांची भरती ही टपाल खात्यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशभरातील 50 ठिकाणी आज व्हर्च्युअल ऑनलाईन रोजगार मेळावा झाला. दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेळाव्याचे उद्‌घाटन केले.

Central Government
Goa Rain: विजांच्या गडगडाटांसह परतीच्या पावसाने राज्याला पुन्हा झोडपले

स्थानिक पातळीवर संबंधित राज्यांतील मंत्र्यांनी केंद्र सरकारच्या नियुक्ती पत्रांचे वितरण केले. राज्यातील हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झाला. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पोस्ट मास्टर जनरल सईद रशीद, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

देशभरात दहा लाख नोकऱ्यांचे उद्दिष्ट

देशात विविध क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. देशाची वाटचाल विकासाकडे चालू आहे. यासाठी तुम्ही योगदान द्या, असे आवाहन केंद्र सरकारच्या (Central Government) सेवेत नव्याने दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रीपाद नाईक यांनी केले आहे. देशभरात दहा लाख नोकऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com