Goa DGP on Canada citizen:  Dainik Gomantak
गोवा

गोवा पोलिसांनी फेटाळला कॅनडाचा दावा; 8 वर्षात एकाही गुन्ह्यात कॅनेडियन नागरिकाचे नाव नसल्याचे स्पष्टीकरण...

2015 मध्ये कॅनेडियन नागरिकावर दाखल झाला होता गुन्हा

Akshay Nirmale

Goa DGP on Canada citizen: कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तसेच त्यांच्या दुतावासातर्फे कॅनेडियन नागरिकांना भारतात दिल्लीत, गोव्यात पर्यटनासाठी जाताना सावधानता बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यावर गोवा हे ठिकाण कॅनेडियन नागरिकांसाठी सुरक्षित असून येथील गुन्ह्यांमध्ये कधीही कॅनेडियन नागरिकांची नावे आलेली नाहीत, असे स्पष्टीकरण गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

जसपाल सिंग यांनी म्हटले आहे की, सावधगिरी बाळगण्याची सूचना सामान्य असली तरी गोव्याबाबत ती वस्तुस्थितीवर आधारीत नाही. परदेशी पर्यटक विशेषतः महिलांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने गोव्याला नेहमीच पसंती दिली आहे.

चालू वर्षात नेदरलँडमधील महिला पर्यटकाची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर गतवर्षी रशियन आणि ब्रिटिश व्यक्तींबाबत असे प्रकार घडले होते. त्यातील आरोपींनाही अटक केली आहे. दरवर्षी गोव्याला लाखो पर्यटक भेट देतात. विविध देशातील उच्च राजकीय नेते, अधिकाऱ्यांनी नेहमीच गोव्याने पर्यकांना प्रदान केलेल्या सुरक्षित वातावरणाबद्दल प्रशंसा केली आहे.

2015 मध्ये कॅनेडियन नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, एकाही कॅनेडियन नागरिकाचा कुठल्याही गुन्ह्यात सहभाग नव्हता. किंवा कॅनेडियन नागरिकाबाबत काहीही गुन्हा घडलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: 'मी पूर्ण सहकार्य केले, आता त्या राजकीय नेत्यांचीही चौकशी करा!' रमा काणकोणकर यांची मागणी

Opinion: जानेवारीत गोयचो दौरो करप जालेंच, तर मेळूया गोयांनच! अट्टल गोंयकाराचे मराठी मन..

Manoj Bajpayee at IFFI: ‘..श्रीकांत तिवारी इज कमिंग’! इफ्फीत ‘द फॅमिली मॅन’चा खास शो; मनोज वाजपेयीची धाकड एन्ट्री

Horoscope: अनेक शुभ योगांचा दिवस! 'या' राशींची होणार चांदी; आज मिळणार गोड बातमी

Goa Politics: 'गोमंतकीय जनतेला भाजप सरकार नकोय'! आरजीपीचा हल्लाबोल; फुटीरांना पक्षप्रवेश नको याबाबत परब ठाम

SCROLL FOR NEXT