Cricket Betting Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Betting: भारत-पाक फायनल सामन्यावर सट्टा, सांकवाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 लाखांच्या मुद्देमालासह 5 जण ताब्यात

Goa Police Raid: लिसांनी सांकवाळ (Sancoale) येथील एका आलिशान व्हिलामध्ये सुरु असलेल्या अवैध ऑनलाइन जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला.

Manish Jadhav

Goa Police Raid: आशिया कप 2025 मधील फायनल सामन्यात पाकिस्तानची दाणादाण उडवून भारताने विजेतेपद पटकावले. एकीकडे देशात उत्साहाचे वातवारण असताना दुसरीकडे गोवा पोलिसांनी रविवारी (28 सप्टेंबर 2025) रात्री उशिरा धडक कारवाई केली.

पोलिसांनी सांकवाळ (Sancoale) येथील एका आलिशान व्हिलामध्ये सुरु असलेल्या अवैध ऑनलाइन जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल सामन्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा मारुन 5 जणांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

10 लाखांचा मुद्देमाल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा रिओ डी गोवा (Tata Rio de Goa) जवळील एका व्हिलामध्ये अवैध सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक आनंद एल. शिरोडकर आणि पीएसआय कॅरी फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक साहित्य जप्त केले. यामध्ये 54 मोबाईल फोन, 7 लॅपटॉप, वाय-फाय राउटर, एक टीव्ही, 17 बँक पासबुक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा समावेश आहे. पोलिसांनी तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक झालेले आरोपी कोण?

दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी पाच व्यक्तींना जुगारात सक्रिय असताना रंगेहाथ पकडले. हे सर्व आरोपी झुआरीनगर परिसरात वास्तव्यास होते. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी (Accused) हे मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या विविध राज्यांतून आलेले होते. हाय-प्रोफायल क्रिकेट सामन्यादरम्यान अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांवर पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सध्या अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय फर्नांडिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या जुगार अड्ड्यामागे आणखी कोण मोठे सूत्रधार आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT