Goa Crime: ब्रेकअपनंतर प्रेयसीचे खासगी फोटो टाकले ऑनलाईन, सोशल मीडियावर काढली फेक अकाउंट्स; 22 वर्षीय तरुणाला अटक

Goa Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दीम मोहम्मद याने नातेसंबंध असताना प्रेयसीचे मिळवलेले खासगी फोटो खोटे सोशल मीडिया खाते तयार करून इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर टाकल्याचा पीडित मुलीचा आरोप आहे.
Arrest
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पूर्वी प्रेमसंबंध होते मात्र नातेसंबंध संपल्यानंतर त्याने इंस्टाग्राम व स्नॅपचॅटवर बनावट खाती तयार करून हे फोटो तिच्या ओळखीच्या लोकांना पाठवले. या प्रकारामागे हेतुपुरस्सर छळ व बदनामी करण्याचा उद्देश असल्याने मुलीने तक्रार देताच सायबर गुन्हे शाखेने करंझाळे येथील २२ वर्षीय युवक मोहम्मद सद्दीम याला अटक केली आहे.

चौकशीदरम्यान संशयित सहकार्य करत नसल्याने त्याला अटक करून जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७९ व ३५६ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलम ६६-सी, ६६-ई, ६७ व ६७-ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दीम मोहम्मद याने नातेसंबंध असताना प्रेयसीचे मिळवलेले खासगी फोटो ब्रेक-अपनंतर खोटे सोशल मीडिया खाते तयार करून इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर टाकल्याचा पीडित मुलीचा आरोप आहे.

Arrest
Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

सायबर गुन्हे विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपास करून प्रथम या बनावट खात्यांचा मागोवा घेतला. त्यानंतर संशयिताने खोट्या नावाने चालवलेली खाती शोधून, मडगाव व पणजी परिसरात शोध मोहीम राबवून अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Arrest
Goa Crime: घृणास्पद! दारूच्या नशेत 14 वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधम पित्याला अटक

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गोपनीयतेचा भंग व बदनामीसंदर्भातील कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत खोटी ओळख तयार करणे, खाजगी माहिती प्रसारित करणे व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील मजकूर प्रकाशित करण्यासंदर्भातील गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com