Hotels in Goa |
Hotels in Goa |  Dainik Gomantak
गोवा

Hotels in Goa: नोंदणी न केल्याप्रकरणी 800 हॉटेल्सना नोटिसा

दैनिक गोमन्तक

Hotels in Goa: पर्यटन खात्याकडे नोंदणी न केलेल्या गोव्यातील सुमारे 800 हॉटेल्स व इतर पर्यटक निवासांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दर आठवड्याला जवळपास 30 हॉटेल्सना नोंदणी न केल्याबद्दल का कारवाई करण्यात येऊ नये, नोटीस देऊन यासंदर्भात पंधरवड्यात स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

हल्लीच 31 हॉटेल्स व रेस्टॉरंटविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आला होता, अशी माहिती पर्यटन संचालक निखिल देसाई यांनी दिली.

पर्यटन कायद्यानुसार राज्यातील पर्यटकांना निवास देणाऱ्या हॉटेल्स तसेच इतर होम स्टे व निवास खात्याकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. या नोंदणीसाठी यापूर्वी पुरेशी मुदत देण्यात आली होती, मात्र तरी अनेकांनी ही नोंदणी केलेली नाही.

त्यामुळे खात्याने अशा हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची माहिती घेण्यास सुरू केले आहे. अनेकानी नोंदणी न करता पर्यटन व्यवसाय केल्याबद्दल पर्यटन खात्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

त्यांनी खात्याचा महसूल बुडविला आहे. त्यामुळे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Shortage : पाणी प्रश्‍नावरून साकोर्ड्यात संताप; विहिरी आटल्याने पंप बंद

Bodgeshwar Temple Theft : चोरांच्‍या टोळीला आणले गोव्‍यात; नऊ दिवसांची कोठडी

Sattari Rain : सत्तरीला पावसाचा जोरदार तडाखा; वाहनचालकांची तारांबळ

Lairai Devi Jatra 2024 : श्री लईराई देवीच्या दर्शनासाठी शिरगावात गर्दी

भारतात सामील होण्याचे पीओकेमध्ये झळकले ‘पोस्टर’, काश्मीरी जनता अजूनही रस्त्यावर; शाळा, कार्यालये बंद

SCROLL FOR NEXT