Mahadayi River: म्हादईप्रश्‍नी न्यायालयीन लढा बळकट करण्यावर भर -राजेंद्र केरकर

म्हादईच्या विषयावर न्यायालयीन लढा देताना आपली बाजू कशी बळकट करता येईल, यावर आमचा भर राहील, असे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर म्‍हणाले.
 Mahadayi River
Mahadayi RiverDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi River: गुरुवारी म्‍हादईच्‍या मुद्यावर विधानसभेत सविस्तर चर्चा झाली. या कामकाजावर पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर लक्ष ठेवून होते. त्यांनी सर्व आमदारांची मते ऐकली. केरकर म्‍हणाले, काहीजणांना म्हादईचा उगम नक्की कुठे झाला, याचे ज्ञानही नसल्याचे दिसून आले.

परंतु, म्हादईवर चर्चा ठेवल्याने अनेकांना किमान अभ्यास तरी करून यावा लागला, ही त्यातल्या त्यात एक जमेची बाजू आहे.

यावेळी केरकर म्हणाले, की म्हादईच्या विषयावर न्यायालयीन लढा देताना आपली बाजू कशी बळकट करता येईल, यावर आमचा भर राहील.

याबाबत सरकार आणि विरोधी पक्षालाही मार्ग दाखविण्याचे काम पर्यावरण कार्यकर्त्यांकडून केले जाईल. ही चळवळ पूर्णपणे लोकचळवळ बनविणे आवश्‍यक आहे.

 Mahadayi River
Illegal Tourist Boats: बेकायदा पाच पर्यटक बोटी जप्त; कॅप्‍टन ऑफ पोर्टस्‌ची कारवाई

हा केवळ म्हादई नदीचाच विषय नाही, तर अन्य दहा नद्या आणि 45 उपनद्या, त्याचबरोबर छोटे-छोटे ओहोळही यात आहेत. विधानसभेत शुक्रवारी जो ठराव मांडला आणि ज्या मागण्या मंजूर झाल्या, त्यावर राज्य सरकारने प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे.

सरकार कुठे कमी पडत असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही राजेंद्र केरकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com