arrested  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

Lawrence Bishnoi: पंजाब पोलिस त्याचा शोध घेत होते. संशयित हणजूण येथे लपून बसल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांनी गोवा पोलिसांना दिली.

Pramod Yadav

पणजी: उत्तर गोव्यातील हणजूण पोलिसांनी मोठी कारवाई करत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संबधित सात जणांना ताब्यात घेतले. यात बिश्नोईचा जवळचा सहकारी विष्णू बिश्नोई याचा देखील समावेश आहे. हणजूण पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली. विष्णूवर खूनाचा आरोप असून, पंजाब पोलिस त्याचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते.

या प्रकरणी अधिकची माहिती अशी की, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सातजण उत्तर गोव्यातील हणजूण येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यात विष्णू बिश्नोई याचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाली. विष्णूवर खूनाच्या घटनेतील आरोपी असून, पंजाब पोलिस त्याचा शोध घेत होते. संशयित हणजूण येथे लपून बसल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांनी गोवा पोलिसांना दिली.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोवा पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. हणजूण पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर विष्णू बिश्नोई यांच्यावर खूनचा आरोप असल्याची माहिती मिळाली.

तर, इतर सात जणांवर गुन्हेगारी संबंध अथवा संशयाची माहिती न मिळाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. विष्णूला पुढील कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, ही कारवाई पूर्णपणे पूर्वनियोजित आणि पंजाब पोलिसांच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT