
Funny Animal Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होतात. तुम्हीही सोशल मीडियावर असाल तर तुम्हीही रोज अशा पोस्ट पाहत असाल. यातील काही पोस्ट तर खूपच कमी वेळात व्हायरल होतात आणि जगभरात पोहोचतात. तर दुसरीकडे, कधी जुगाडाचे व्हिडिओ, तर कधी धोकादायक स्टंट करतानाचे व्हिडिओ चर्चेत येतात. एवढचं नाही तर कधी कधी लोकांच्या विचित्र आणि मजेशीर करामतीही व्हायरल होतात. पण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
सध्या जो व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे, त्यात एक सिंहीण एका कुत्र्याच्या जवळ जाताना दिसते. सिंहीणीला पाहून कुत्रा घाबरण्याऐवजी तिच्यावर मोठ्याने भुंकायला लागतो. इतकेच नाही, तर तो अचानक तिच्या दिशेने उडी मारतो, ज्यामुळे सिंहीणही घाबरुन मागे जाते. यानंतर कुत्रा जितक्या वेळा भुंकत तिच्या दिशेने जातो, तितक्या वेळा ती घाबरुन मागे हटते. या व्हिडिओमध्ये सिंहीण कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करताना दिसते, हे दृश्य खूपच मजेशीर आहे.
हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. तरीही, हे मजेदार दृश्य पाहून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे दृश्य पाहून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ एक्सवर @itssunildutt नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चल हट बे, शेर होगा अपने घर में, हम प्रशासन से भी नहीं डरते.' हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून, अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने हसणाऱ्या इमोजीने आपली प्रतिक्रिया दिली, जी अनेकांना आवडली आहे.
हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत, कारण जंगलाची राणी असलेल्या सिंहीणीला एका साध्या कुत्र्याने घाबरवल्याचे दृश्य अनपेक्षित आहे. कुत्र्याचा (Dog) आत्मविश्वास आणि सिंहीणीची भीती या दोन गोष्टींमुळे हा व्हिडिओ खूपच लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियाची हीच ताकद आहे की, असे अनोखे आणि मजेदार क्षण लोकांपर्यंत लगेच पोहोचतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.