Vishwajit Rane bungalow protest inquiry Dainik Gomantak
गोवा

त्या आंदोलकांची चाैकशी सुरू, विश्वजीत राणेंच्या घरावर मोर्चा अंगलट; अनेकांनी दिल्या जबान्या

Vishwajit Rane bungalow protest inquiry: नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या खासगी निवासस्थानावर नेलेल्या मोर्चात सहभागी झालेल्यांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या खासगी निवासस्थानावर नेलेल्या मोर्चात सहभागी झालेल्यांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. काही जणांना सुरवातीला आगशी पोलिस ठाण्यात बोलावले होते त्यानंतर त्यांची पणजी पोलिसात चौकशी करण्यात आली.

बेकायदेशीरपणे जमाव करणे, खासगी जागेत अतिक्रमण करणे, मंत्री व कुटुंबियांच्या जीवाला धोका उत्पन्न करणे, असभ्य भाषेचा प्रयोग करणे आदी कलमांतर्गत राज्यभरातील दीड हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी काही जणांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार बजावण्यात आली होती. त्या नोटीशीला प्रतिसाद म्हणून अनेकांनी पोलिस स्थानकात हजर राहून आपल्या जबान्या दिल्या.

नगरनियोजन कायद्यातील ३९ अ कलम रद्द करावे यासाठी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी समर्थकांसह खात्याच्या पाटो येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून कार्यालयाबाहेर काढल्यानंतर त्यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केले होते.

त्यांचे हे उपोषण सुरू असतानाच तेथे त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेले शेकडोजण नगरनियोजनमंत्री राणे यांच्या खासगी निवासस्थानावर चालून गेले होते. त्या आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत राणे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या दिला आणि घोषणाबाजी केली होती. त्या प्रकरणी आता आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी स्वतःहून दाखल केलेल्या या गुन्ह्यांत अनेक नेते, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. नगरनियोजन कार्यालयातील फाईल चोरी झाल्याचा दावा करून आमदार बोरकर व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्याप्रकरणी सरकार ते प्रकरण पुढे रेटणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे बोरकर यांनी उपोषण मागे घेताना जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचे प्रकरण तेथेच संपले असे अनेकांना वाटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Cavelossim Assolna bridge: केळशी-असोळणा पुलाची धोकादायक फट बुजवली, वॉरन यांनी वेधले लक्ष; 4 तासांत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

VIDEO: अर्शदीपचा वार अन् 'सूर्या'ची हार! सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगनं चाहत्यांचं फिरलं डोकं; सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

इराण 440 किलो युरेनियम अमेरिकेकडे सोपवणार? ट्रम्पचा धक्कादायक दावा; म्हणाले, ''करारासाठी स्वतः इस्लामाबादला जाणार''

SCROLL FOR NEXT