इराण 440 किलो युरेनियम अमेरिकेकडे सोपवणार? ट्रम्पचा धक्कादायक दावा; म्हणाले, ''करारासाठी स्वतः इस्लामाबादला जाणार''

Donald Trump Iran Uranium Deal Claim: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक अत्यंत खळबळजनक आणि जागतिक राजकारणाला कलाटणी देणारा दावा केला.
Donald Trump Iran Uranium Deal Claim
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Iran Uranium Deal Claim: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक अत्यंत खळबळजनक आणि जागतिक राजकारणाला कलाटणी देणारा दावा केला. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणने आपले 400 किलो संवर्धित युरेनियम अमेरिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शवली. हा दावा जागतिक शांततेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल मानले जात असून लवकरच अमेरिका आणि इराणमध्ये एक ऐतिहासिक करार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी जाहीर केले की, जर हा करार यशस्वी झाला, तर ते स्वतः इस्लामाबादला जातील आणि तिथे इराणच्या नेत्यांशी भेटून युरेनियमबाबतच्या पुढील योजनेवर चर्चा करतील.

व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराण आता अमेरिकेच्या (America) सर्व 10 अटी मान्य करण्यास तयार आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरु असलेला हा लष्करी संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून सुरु असलेल्या या युद्धात दोन्ही देशांसह संपूर्ण जगाचे मोठे नुकसान झाले. मात्र, अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे आता इराणने नमती भूमिका घेतली असून त्यांनी अण्वस्त्रे न बनवण्यावर आणि आपला युरेनियमचा साठा अमेरिकेला सोपवण्यावर संमती दर्शवली. ट्रम्प यांनी इराणच्या या निर्णयाचे 'समजूतदारपणाचा निर्णय' म्हणून स्वागत केले.

Donald Trump Iran Uranium Deal Claim
US Iran War: इराणला उद्ध्वस्त करण्याची ट्रम्प यांची 'ब्लूप्रिंट' तयार! तेहरानसमोर ठेवल्या 10 जाचक अटी; म्हणाले, 'ही फायनल ऑफर'

मिडल ईस्टमध्ये सुरु असलेला हा लष्करी संघर्ष येत्या दोन-तीन आठवड्यांत संपुष्टात येईल, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला. इराणवरील दबावामुळे ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून अमेरिका आता इराणमधून (Iran) आपले सैन्य मागे घेण्याच्या विचारात आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला की, जरी इराण आता लवचिक भूमिका घेत असला, तरी जर चर्चेतून समाधानकारक मार्ग निघाला नाही, तर अमेरिका पुन्हा एकदा जोरदार हल्ला करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता इराण फेब्रुवारीपर्यंत ज्या अटींना विरोध करत होता, त्या आता मान्य करु लागला आहे, ही जगासाठी सकारात्मक बातमी आहे.

Donald Trump Iran Uranium Deal Claim
US Iran War: ट्रम्प यांचा इराणला थेट 'चेकमेट'! अमेरिकन नौदलाकडून बंदरांची नाकेबंदी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचे ढग दाटले

या करारामुळे केवळ अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होणार नाही, तर संपूर्ण जगाला भेडसावणारे तेल आणि वायूचे संकटही दूर होईल. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर स्थिर होण्यास यामुळे मोठी मदत मिळणार आहे. ट्रम्प यांचा हा दावा जर सत्यात उतरला, तर जागतिक राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होईल आणि मध्य आशियातील युद्धाचे ढग विरळ होतील. आता जगाचे लक्ष 28 फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या या संघर्षाच्या अधिकृत समाप्तीकडे आणि ट्रम्प यांच्या आगामी इस्लामाबाद दौऱ्याकडे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com