Sexual Assault cases in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलिसांना हे शोभतं का? अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एक संशयित फरार

Akshay Nirmale

Goa Police: महिला अत्याच्याराच्या गुन्ह्यांबाबत गोवा पोलिसांनी झीरो टॉलरन्स धोरण स्विकारलेले असले तरी दोन प्रकरणांत मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल हयगय केल्याचे समोर आले आहे. ही दोन्ही प्रकरणे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांबाबतची आहेत, इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

या प्रकरणांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. यातील पीडीत दोन्ही मुली दहावीच्या विद्यार्थीनी आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मध्यस्थीनंतर अखेर एक गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसरा गुन्हा पीडित सहाय्यता युनिट (VAU) आणि बाल कल्याण समिती (CWC) यांच्या मध्यस्थीनंतर नोंदवण्यात आला आहे. पहिल्या घटनेत, अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी चार वेळा बलात्कार केला होता.

तिला अनेक गर्भपातही करावे लागले होते. तिने शाळेच्या समुपदेशकाला ही घटना सांगितल्यावर त्यांनी तिला महिला पोलीस स्टेशन पणजी येथे नेले. तेथील महिला अधिकाऱ्याने विद्यार्थीनीला परीक्षा देऊन परत येण्यास सांगितले. पण माझी तक्रार घेतली गेली नाही, असे पीडितेने तिच्या निवेदनात म्हटले आहे.

आई रुग्णालयात असताना वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला गेला होता. तिने सांगितले आहे की, मी तीन वेळा गर्भवती राहिले. तिन्ही वेळी मला गोळ्या दिल्या गेल्या. मी तिसर्‍यांदा गर्भवती राहिले, तेव्हा वडील एकदा डॉक्टरांकडे घेऊन गेले होते.

मुलीने गोवा पोलिसांच्या 112 हेल्पलाइनवर कॉल केल्यावर आगाशी पोलिसांनी तिच्या शाळेला भेट दिली आणि तिची तक्रार नोंदवण्याचे आश्वासन दिले. VAU ने यात लक्ष घातले. पण पोलिसांच्या सुस्त वृत्तीमुळे गुन्हेगार फरार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT