Oceanarium in Goa: गोव्यातील किटला येथे ओशनॅरियम होणार; 800 कोटी रूपये खर्च अपेक्षित

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची माहिती
Oceanarium in Goa | Tourism Minister Rohan Khaunte
Oceanarium in Goa | Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
Published on
Updated on

Oceanarium in Goa: केपे तालुक्यातील किटला (Quitol) येथे ओशनॅरियम (सागरी मत्स्यालय) सुरू करणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. स्थानिकांसह पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल. या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.

दशकभरापूर्वीच राज्य सरकारतर्फे मिरामार येथे ओशनॅरियम उभारण्याची योजना होती. परंतु ती प्रत्यक्षात आली नाही. तथापि, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात ओशनॅरियम हे आणखी एक आकर्षणाचे केंद्र ठरेल, गोव्याच्या पर्यटनाला त्यातून एक आगळे वैशिष्ट्य मिळेल, असे अधिकाऱ्यांना वाटते.

Oceanarium in Goa | Tourism Minister Rohan Khaunte
CM Pramod Sawant: 'हर घर नल' नव्हे, ही तर 'हर घर मल' योजना; अमित पाटकरांची सावंत सरकारवर घणाघाती टीका

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, गोव्यात ओशनॅरिम तयार करण्याची कल्पना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्लू इकॉनॉमीच्या विकासाला प्राधान्य देणारी आणि सागरी संसाधनांचा शोध घेऊन त्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

मी नुकतीच पोर्तुगालमध्ये गेलो होतो. तिथे एक ओशनॅरियम पाहिले. गरज वाटल्यास पोर्तुगालबरोबर याबाबत तंत्रज्ञान भागीदारी करार करता येईल. चार वर्षांपूर्वी, राज्य सरकारने किटला येथील जागेची पाहणी केली होती. प्रकल्पासाठी ही जागा अत्यंत योग्य आहे.

या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. या प्रकल्पासाठी बहुतांश निधी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून मिळवला जाईल आणि हा देशासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याने राज्य पंतप्रधानांकडेही याबाबत संपर्क साधेल. या प्रकल्पामुळे दक्षिण गोव्यातील तरुणांना रोजगार मिळेल.

Oceanarium in Goa | Tourism Minister Rohan Khaunte
Panaji Smart City : पणजीला ‘स्मार्ट’ करणाऱ्या कंत्राटदाराचा भोंगळ कारभार

राज्य सरकार आणि GTDC च्या संचालक मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने बोलीदारांना तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यातून संकल्पनात्मक प्राथमिक डिझाइन आणि बाजारदरांवर आधारित तपशीलवार अंदाज मागवले आहेत.

बिडर्सना केंद्र आणि राज्याकडून निधी मिळविण्यासाठी डीपीआर तयार करावा लागेल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्याच महिन्यात केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी, सागरी मत्स्यालयाच्या प्रस्तावाचा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि रोहन खंवटे यांना सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com