Goa Cabinet Reshuffle: दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा होणार मंत्री? लवकरच फेरबदल शक्य

केंद्रीय नेतृत्वाने ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा, सध्याच्या मंत्रीमंडळातून दोघांना वगळावे लागणार
Goa Cabinet Reshuffle
Goa Cabinet Reshuffle Dainik Gomantak

Goa Cabinet Reshuffle: गोवा काँग्रेसमधील आठ आमदारांनी गतवर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या आठ पैकी काही आमदारांना त्यावेळी मंत्रीपद देण्यात येईल, असे कबुल केले होते असे सांगितले जाते. अखेर राज्याच्या मंत्रीमंडळ फेरबदलातून आता तशी संधी दोन आमदारांना मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

ज्येष्ठ आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, तसेच आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

Goa Cabinet Reshuffle
Oceanarium in Goa: गोव्यातील किटला येथे ओशनॅरियम होणार; 800 कोटी रूपये खर्च अपेक्षित

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, रूडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, दिलायला लोबो, मायकल लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक या आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपममध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच यातील कुणाची वर्णी मंत्रीमंडळात लागणार याची चर्चा होती.

जवळपास सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. या काळात मंत्रीपदाची चर्चा बऱ्याचदा झाली. पण तरीही मंत्रीमंडळ विस्तार किंवा मंत्रीमंडळात बदल झालेला नाही. त्यामुळे या आमदारांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा होती.

आता मात्र या आमदारांमधील काहींना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही त्याला ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते. आगामी आठवड्यात मंत्रीमंडळ पुर्ररचना होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Goa Cabinet Reshuffle
Satya Pal Malik : गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ‘सीबीआय’कडून नोटीस

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फर्मागुडी येथे सभा झाली होती. यावेळी शाह यांनी दिगंबर कामत यांच्याशी चर्चा केली होती. कामत दिल्लीला जाऊन शाह यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.

दक्षिण गोव्यात भाजपला बळकटी देण्यासाठी कामत यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर आलेक्स सिक्वेरा हे देखील माजी मंत्री असून ते नुवेचे आमदार आहेत. अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना मंत्रीपद दिले जाऊ शकते.

दरम्यान, दोन नवीन मंत्री घ्यायचे असतील तर सध्याच्या मंत्रीमंडळातून दोन मंत्र्यांना डच्चू द्यावा लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या काही मंत्र्यांमध्येही अस्वस्थता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com