Goa Police काही चालक मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याने वाहतूक पोलिसांनी नवी युक्ती शोधून काढली आहे. विशेषत: गर्दी असलेल्या मद्यालयातून व्यक्ती बाहेर येते आणि वाहन घेऊन रस्त्यावर येते, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस अशा मद्यालयांबाहेर तैनात करण्याचे ठरविले आहे.
अशा चालकांची मद्य चाचणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासह वाहन ताब्यात घेऊन पर्यायी चालक येईपर्यंत ते देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणे यापुढे त्रासदायक ठरणार आहे.
बाणस्तारी येथील भीषण अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विषयाची गंभीर दखल घेतली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवण्यावर कायद्याने बंदी आहे. तरीही काहीजण या नियमाचे पालन करत नाहीत.
अनेकदा मद्यप्राशन केलेल्या चालकांविरोधात मोहीम राबविली जाते. पोलिसांनी जनजागृती करूनही चालक मद्यप्राशन करून वाहने हाकतात. रात्रीच्या पार्ट्यांना वाहनातून जाताना जो कोणी चालक असतो, त्याने मद्यपान करू नये, असा नियम असूनही त्याचे पालन केले जात नाही.
चाचणी होणार
यापूर्वी वाहतूक पोलिसांनी मद्यालयांना सूचना करून वाहन चालविणाऱ्याने मद्यप्राशन करू नये, असे फलक लावण्यास सांगितले होते.
मात्र, त्याची कार्यवाही काही मद्यालयांनी केली, तर काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता मद्यालयांनाही या सूचनांचे पालन करण्याच्या पुन्हा सूचना करणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.
मद्यचाचणी : 364 जणांवर कारवाई
यापुढे मद्यालयातून बाहेर येणारी व्यक्ती जर वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर नजर ठेवण्यासह त्यांची मद्य चाचणी करून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिस विभागाने जारी केले आहेत.
मद्यप्राशन केलेल्या चालकांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत उत्तर गोव्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ३६४ जणांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.