Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: ''खाकी कलंकितच, भ्रष्ट पोलिसांची मी यादी उघड करू शकतो'', आमदार सरदेसाईंचा रोखठोक इशारा

Vijai Sardesai: गोवा पोलिस भ्रष्टाचारात आकंठ बरबटलेले, हप्ते जमा करून वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचे प्रकार- सरदेसाईं

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai आम्ही सरदेसाई आहोत, आमचा इतिहास पोलिस महासंचालकांनी तपासावा, खाकीला घाबरणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असे ठणकावत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची पुरती कोंडी केली.

कोण कोण पोलिस हप्ते घेतात, याची माझ्याकडे यादी आहे ती सादर करू काय, अशी विचारणाच थेट सरदेसाई यांनी केली. ‘ट्विटर’वर उद्दाम उत्तर देणाऱ्या महासंचालकांची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करू का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

महासंचालकांना केंद्रीय गृहमंत्री ओळखतात की नाही मला माहीत नाही, मला मात्र ते ओळखतात. कारण त्यांच्या भाजप सरकारमध्ये मी उपमुख्यमंत्री होतो, असेही सरदेसाई म्हणाले.

सरदेसाई यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याबद्दल ‘ट्विटर’वर टीका केली होती. त्याला उत्तर देताना महासंचालकांनी पोलिस अधिकाऱ्यांना सल्ले देण्याची आवश्‍यकता नाही. लोकप्रतिनिधी आता डॉक्टर्स आणि अभियंत्यांनाही सल्ले देणार का, असे ट्विट केले होते.

त्याचा खरपूस समाचार घेताना सरदेसाई यांनी पोलिस महासंचालकांना खुले आव्हान दिले. ते महासंचालकांनी स्वीकारले नाही तर सरदेसाई यांनी पोलिसांवर केलेले आरोप खरे आहेत, असे महासंचालकांनी मान्य केल्यासारखेच होणार आहे.

राज्यातील इतर लोकप्रतिनिधींप्रमाणे पोलिस महासंचालकांनी केलेली टीका सहन करणारा मी नाही. मी विद्यार्थी आंदोलनाच्या चळवळीतून आलो असून आमदार पदापर्यंत पोहचलो आहे. मी कोणालाही घाबरत नाही, हे महासंचालक सिंग यांनी ध्यानात ठेवावे.

लोकप्रतिनिधींना सल्ले किंवा त्यांच्या टीकेला उत्तरे देण्यापेक्षा गोवा पोलिस खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराकडे त्यांनी लक्ष द्यावे. फातोर्डा मतदारसंघात अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचारी वाढवावेत, अशी मागणी केली होती.

ती त्यांना अद्याप पूर्ण करता आलेली नाही, असे सरदेसाई म्हणाले. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस खात्यातील या भ्रष्टाचाराची दखल घ्यावी. अन्यथा केंद्रीय गृहमंत्र्यांना यासंदर्भात पत्र पाठवू, असा इशाराही सरदेसाई यांनी दिला.

त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून अनेक गोमंतकीयांनी पोलिसांच्या कारभाराचा पंचनामा करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सरदेसाईंच्या धाडसाचे कौतुक

समाज माध्यमांवर सरदेसाई यांच्या धाडसाचे जनतेने मोठे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ दुपारीच व्हायरल झाल्यानंतर त्यांना पाठिंबा देणारे आणि पोलिसांच्या गैरकृत्यांचे वाभाडे काढणाऱ्या प्रतिक्रिया अनेक गोमंतकीयांकडून व्यक्त केल्या गेल्या.

माझे महासंचालकांशी वैयक्तिक काहीही वैर नाही. मात्र, चूक ती चूकच. मी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही, असेही सरदेसाई यांनी ठणकावले आहे. विद्यार्थी दशेत मी पोलिस ठाणे रात्रीच्या वेळी रंगवले होते, याची आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत.

कोणाला किती हप्ते पोहोचतात, याची यादी माझ्याकडे!

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर टीका करण्याचा लोकप्रतिनिधींना पूर्णत: अधिकार आहे. मी स्वाभिमानी गोमंतकीय असून मटका किंवा स्क्रॅपचे हप्ते घेणारा नाही. त्यामुळे पोलिस महासंचालकांनी बोलताना विचार करून बोलावे आणि मला शहाणपण शिकवू नये.

त्यांनी सार्वजनिक टीकेला सामोरे जाऊन त्याला उत्तर द्यावे. राजकारण्यांप्रमाणे ‘ट्विटर’वर उत्तरे देऊ नयेत. कोणता पोलिस किती पैसे खातो आणि त्यांचे हप्ते कोणाला, कोठपर्यंत पोहोचतात, याची यादी मी देऊ शकतो. त्यामुळे सिंग यांनी विचार करूनच माझ्याशी बोलावे, असा गर्भित इशारा सरदेसाई यांनी सिंग यांना दिला.

जसपाल सिंग ‘तेव्हा’ का राहिले गप्प?

एनसीबी तसेच हैदराबादचे पोलिस गोव्यातील ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश करत आहेत. यापूर्वीही गोवा पोलिसांनी हैदराबाद पोलिसांची कारवाईवेळी सतावणूक केली आहे. त्याची माहिती हैदराबादच्या पोलिस आयुक्तांनी स्वतःच उघड केली होती.

तेव्हा पोलिस महासंचालकांनी त्यांच्यावर का टीका केली नाही किंवा त्यांच्यावर नुकसान भरपाईचा दावा केला नाही, असा प्रश्‍न आमदार सरदेसाई यांनी केला.

‘पोलिसांवर टीका खपवून घेणार नाही’

नागरिकांनी पोलिसांच्या कामावर केलेल्या टीकेला मी ट्विटरद्वारे उत्तर दिले होते. मी कोणालाही वैयक्तिकपणे बोललो नव्हतो.

पोलिसांवर कोणीही ऊठसूट टीका केल्यास ती खपवून कशी घेऊ? पोलिसांना सल्ला देणारे नागरिक हे काही तज्ज्ञ नाहीत, असा पलटवार जसपाल सिंग यांनी ‘ट्विट’द्वारे केला आहे.

वरिष्ठांपर्यंत पोहोचतात पैसेे

गोवा पोलिस भ्रष्टाचारात आकंठ बरबटलेले आहेत. काही अधिकाऱ्यांची विशिष्ट ठिकाणी हप्ते जमा करून वरिष्ठांपर्यंत ते पोहचवण्यासाठी नियुक्ती करण्याचे प्रकार घडत आहेत.

वेळप्रसंगी लाच घेणाऱ्या भ्रष्ट पोलिसांची यादीच मी उघड करू शकतो, असा रोखठोक इशारा विजय सरदेसाई यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT