Vincy Barretto: गुड न्यूज! गोमंतकीय खेळाडूची भारतीय फुटबॉल संघात निवड; चीनमध्ये होणार स्पर्धा

Vincy Barretto: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सुनील छेत्रीवर मदार
Vincy Barretto
Vincy BarrettoDainik Gomantak
Published on
Updated on

Vincy Barretto selected in Indian Football Team: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या 17 सदस्यीय भारतीय संघात व्हिन्सी बार्रेटो हा एकमेव गोमंतकीय फुटबॉलपटू आहे.

अनुभवी सुनील छेत्री संघातील एकमेव नावाजलेला खेळाडू असून त्याच्यावरच मदार असेल.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील क्लब आणि फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांनी आशियाई स्पर्धेसाठी खेळाडूंना मुक्त करण्यासाठी समन्वय साधल्याबद्दल संघ जाहीर करताना ‘एआयएफएफ’ने आभार मानले.

‘‘यावेळचा भारतीय फुटबॉल मोसम व्यस्त आहे. कमी कालावधीत भरगच्च वेळापत्रक आहे. त्याचे व्यवस्थापन करणे सोपे नाही,’’ असे एआयएफएफ अध्यक्ष कल्याण चौबे यांनी महासंघाच्या संकेतस्थळावर नमूद केले.

Vincy Barretto
ISL Football स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे हेच ध्येय! एफसी गोवाचे प्रशिक्षक मार्केझ आशावादी

धेंपो स्पोर्टस क्लबच्या अकादमीत तयार झालेला व्हिन्सी 23 वर्षांचा आहे. संघात विंगर या जागी तो खेळतो. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेला तो गोव्यातील एकमेव फुटबॉलपटू आहे.

एफसी गोवाच्या राखीव संघातून खेळल्यानंतर व्हिन्सीने आय-लीग स्पर्धेत 2020-21मध्ये गोकुळम केरळाचे प्रतिनिधित्व केले. आयएसएल स्पर्धेत 2021-22 मध्ये केरळा ब्लास्टर्सकडून, तर 2022-23 मध्ये चेन्नईयीन एफसीकडून खेळला.

यंदाही त्याला चेन्नईच्या संघाने कायम राखले आहे. आयएसएल स्पर्धेतील एकूण ३३ सामन्यांत त्याने पाच गोल केले असून दोन असिस्ट आहेत.

Vincy Barretto
England vs New Zealand: बेन स्टोक्सने झंझावाती शतक झळकावून रचला इतिहास, 'या' दोन खेळाडूंचे मोडले रेकॉर्ड

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ

गुरमीत सिंग, धीरजसिंग मोईरांगथेम, सुमीत राठी, नरेंद्र गहलोत, अमरजीतसिंग कियाम, सॅम्युएल जेम्स, केपी राहुल, अब्दुल राबीह अंजूकंदन, आयुषदेव छेत्री, ब्राईस मिरांडा, अफझर नूरानी, रहिम अली, व्हिन्सी बार्रेटो, सुनील छेत्री, रोहित दानू, गुरकिरत सिंग, अनिकेत जाधव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com