Bangladeshi Deportation Dainik Gomantak
गोवा

Goa Bangladeshi Deportation: पर्यटन नगरीत घुसखोरांचा सुळसुळाट, 6 बांगलादेशींची हकालपट्टी; गोवा पोलिस 'ॲक्शन मोड'मध्ये

Goa Police Bangladeshi Deportation: कोणत्याही वैध प्रवास दस्तऐवजांशिवाय गोव्यात राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी धाडले.

Manish Jadhav

illegal Immigrants in Goa : अवैध स्थलांतर आणि इमिग्रेशन कायद्यांच्या उल्लंघनाविरुद्ध सुरु असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले. कोणत्याही वैध प्रवास दस्तऐवजांशिवाय गोव्यात राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी धाडले. ही हकालपट्टी बुधवारी गोवा फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO) आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या संयुक्त समन्वयाने पार पडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा जणांना एफआरआरओ गोव्याच्या एस्कॉर्ट टीमने बीएसएफकडे सुपूर्द केले, ज्यांनी त्यांना बांगलादेशला पाठवून दिले.

गोव्यात (Goa) गेल्या काही काळापासून अवैध स्थलांतरितांचा शोध घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. आकडेवारीनुसार, 2025 पासून आतापर्यंत गोवा पोलिसांच्या फॉरेनर्स शाखेने 35 बांगलादेशी नागरिकांचा मागोवा घेत त्यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये 9 पुरुष, 7 महिला आणि 19 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

गोवा पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर प्रवेश आणि व्हिसा संपल्यानंतरही अधिक काळ मुक्काम करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई एफआरआरओ आणि इतर संबंधित यंत्रणांच्या मदतीने सुरुच राहील. प्रशासनाने जनतेला आवाहन केले की, त्यांनी आपल्याकडे राहणाऱ्या भाडेकरुंच्या आणि कामावर असलेल्या कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तीची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा फॉरेनर्स शाखेला द्यावी.

अवैध स्थलांतरितांविरुद्धची ही मोहीम केवळ गोव्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्येही पोलिसांनी एक मोठी मोहीम राबवून सुमारे 2000 परदेशी नागरिकांची चौकशी केली. यामध्ये अनेक संशयित बांगलादेशी स्थलांतरितांना पडताळणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी जानेवारी महिन्यातही बंगळुरुमध्ये इलेक्ट्रॉनिक सिटी आणि हेब्बागोडी परिसरातून 26 जणांना अटक करण्यात आली होती.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही बुधवारी घुसखोरीविरोधी मोठी कारवाई करण्यात आली. वर्सोवा पोलिसांनी या वर्षातील एका मोठ्या कारवाईत यारी रोड परिसरातून 25 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये 21 तृतीयपंथीय, दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण वैध कागदपत्रांशिवाय शाकुलशहा दर्ग्या जवळ राहत असल्याचे आढळले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत शहरातून 113 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी 27 जणांची आतापर्यंत मायदेशी हकालपट्टी करण्यात आली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरु असलेल्या या धडक कारवाईमुळे अवैधपणे राहणाऱ्या घुसखोरांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anjuna beach: हणजूण किनाऱ्यावर पुन्हा तेलगोळे; काळ्या चिकट पदार्थामुळे पर्यटकांसह स्थानिक हैराण

Olive Ridley Turtles: वागातोर किनाऱ्यावर स्वतंत्र 'कासव संवर्धन केंद्र' देण्याची मागणी ; 10 कासवांनी घातली 1,160 अंडी, 338 पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश

Pakistan Blast: पाकिस्तान हादरला! क्वेटा येथे रेल्वे ट्रॅकजवळ भीषण स्फोट; 23 जणांचा मृत्यू, 47 गंभीर जखमी Watch Video

Goa Malaria Awareness: साथीच्या रोगांविरोधात 'सत्तरी'सज्ज; प्रतिबंधक उपाय सुरू, आरोग्य विभागाचे गावोगावी सर्वेक्षण

Warkhand Panchayat: बेकायदा बांधकामावर पंचायतीचा दणका, वारखंडमधील प्रकार; नोटीस, पंचनामा आणि पाहणीची प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT