Goa Police Attack Case
Goa Police Attack CaseDainik Gomantak

Goa Police Attack: बुरखाधारी गावगुंडांचा गोवा पोलिसांवर हल्ला! ‘म्हाेरक्या’ कोठडीत; 3 हल्लेखोरांच्या आवळल्या मुसक्या

Goa Police Attack Case: सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसांवर मध्यप्रदेशात १५-२० जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता.
Published on

म्हापसा: सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसांवर मध्यप्रदेशात १५-२० जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता. मेहंदर सिंग, कालू कहिरसिंग दाव, भोरसिंग बामनिया, (सर्व अलीराजापूर) या तिघांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

बुरखाधारी गाव गुंडांनी गोवा पोलिसांच्या वाहनावर धारधार शस्त्रे, कोयता तसेच दगडांनी हल्ला करत गाडीची तोडफोड केली होती. या व गुडांनी पोलिसांच्या ताब्यातून संशयित गुन्हेगार हिरासिंग बामनिया याला सोडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

मध्यप्रदेशातील अलीराजापूर जिल्ह्यात घडलेल्या या थरारक घटनेत गोवा पोलिस पथकातील दोन अधिकारी हे किरकोळ जखमी झाले होते. ही घटना २९ जानेवारी २०२६ रोजी, सायंकाळी ५ ते ६ दरम्यान घडली होती.

Goa Police Attack Case
जंगलात घुसून डाकू 'हिरासिंग'ला पकडले, तपासासाठी गोवा पोलीस मध्यप्रदेशात, वाटेत सशस्त्र जमावाचा हल्ला; काय घडले नेमके? Video

म्हापसा आणि पर्वरी पोलिसांकडे नोंद असलेल्या घरफोडी प्रकरणात संशयित टोळीचा म्होरक्या हिरासिंग बामनिया हा सराईत गुन्हेगार असून, विविध गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे. बामनिया मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळताच, गोवा पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने त्याला अटक केली.

Goa Police Attack Case
Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन संशयित बामनियाला गोव्यात आणले जाताना ही घटना घडली. दरम्यान, म्हापसा व पर्वरी पोलिस स्थानकात नोंद घरफोडी प्रकरणातील, चोरीचा मुद्देमाल अद्याप हस्तगत करायचा आहे. तसेच हिरासिंग याच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेण्याचा प्रयत्न करताहेत. सध्या बामनिया हा दहा दिवसांच्या, पर्वरी पोलिसांच्या कोठडीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com