Goa Police Salary: '..त्यांच्यापेक्षा आम्हाला कमी पगार मिळतो'! गोव्यातील हेड कॉन्स्टेबल्सनी दाखल केली याचिका; खंडपीठाकडून नोटीस

Goa Police Salary Case: सुधारित आश्वासित करिअर प्रगती योजनेअंतर्गत (एमएसीपी) कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
Goa Police Salary Case
Goa Police Salary CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिसांतील ७७ कार्यरत आणि निवृत्त हेड कॉन्स्टेबल्सनी दाखल केलेल्या महत्त्वपूर्ण याचिकेवर सुनावणी करताना, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने भारत सरकार, गोवा राज्य, पोलीस महासंचालक (गोवा) आणि कार्मिक विभाग (गोवा) यांना नोटीस बजावली आहे.

सुधारित आश्वासित करिअर प्रगती योजनेअंतर्गत (एमएसीपी) कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्ते १९९७ मध्ये भरती झालेल्या ३६ व्या बॅचचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत.

Goa Police Salary Case
Goa Police Attack: बुरखाधारी गावगुंडांचा गोवा पोलिसांवर हल्ला! ‘म्हाेरक्या’ कोठडीत; 3 हल्लेखोरांच्या आवळल्या मुसक्या

पदोन्नती आणि ''एमएसीपी'' अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभांच्या वेळेतील फरकामुळे, हे वरिष्ठ कर्मचारी सध्या वेतन मॅट्रिक्स स्तर-४ वर आहेत. याउलट, त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या २००० सालच्या ३९ व्या बॅचच्या कर्मचाऱ्यांना वेतन मॅट्रिक्स स्तर-५ नुसार वेतन मिळत आहे.

Goa Police Salary Case
Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

अधिकृत सेवाज्येष्ठता यादीत वरिष्ठ असूनही वेतन कमी मिळत असल्याने ही याचिका दाखल केली आहे. सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, हा प्रकार संविधानाच्या कलम १४ आणि १६ अंतर्गत ''समान कामासाठी समान वेतन'' या तत्त्वाचे उल्लंघन आहे. याचिकाकर्त्यांनी ''एमएसीपी'' मार्गदर्शक तत्त्वांच्या (दिनांक २२.१०.२०१९ चे कार्यालयीन निवेदन) परिच्छेद ९ च्या घटनात्मक वैधतेलाही आव्हान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com