Domnic D'Souza and his wife Joanna Dainik Gomantak
गोवा

Goa Police: डॉम्निक, जोआना सहा महिन्यांसाठी तडीपार

Goa Police: डॉम्निक याने काही महिन्यांपूर्वी फोंडा येथील 40 वर्षीय इसमाला धर्मांतरासाठी धमकावले होते

Ganeshprasad Gogate

Goa Police: सडये-शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचे धर्मगुरू डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जोआना या दोघांना उत्तर गोव्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज (शनिवारी) दिला.

यासंदर्भात अलीकडेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तशी लेखी मागणी केली होती. या दाम्पत्याने धर्माच्या नावाखाली सामाजिक शांततेला बाधा निर्माण केली आहे, असे या पत्रात म्हटले होते.

फसवणूक व बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या आरोपाखाली सडये-शिवोली येथील फाइव्ह पिलर्स चर्चचे धर्मगुरू डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिसऱ्यांदा अटक केली होता.

दरम्यान, उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी डिसोझा याच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी तडीपारीची कारवाई व्हावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते.

निधीन वाल्सन यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, शिवोलीतील पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर तडीपारीची कारवाई करावी. त्यांनी धर्माच्या नावावरून येथील सामाजिक शांततेला बाधा निर्माण केली आहे.

डॉम्निक याने काही महिन्यांपूर्वी फोंडा येथील 40 वर्षीय इसमाला धर्मांतरासाठी धमकावले, तसेच डॉम्निकने सांगितलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवले, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. काळी जादू कायद्याच्या अंतर्गत कलम U/Sec 153-A, 295-A , 506 (ii) R/w 34 IPC , Sec 3, 4, 7 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT