Goa Vegetable Price: भाजीपाला महागला! बाजारात विकला जातोय तब्बल 8 रूपयांना 1 लिंबू

Goa Vegetable Price: गृहिणींची चिंता वाढली
Goa Vegetable Price
Goa Vegetable PriceDainik Gomantak

Goa Vegetable Price: दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असून महागाईने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांचे खिसे रिकामे केले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असल्याने लिंबूला मागणी वाढली आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सर्वच फळांची आवक आणि मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. द्राक्षे, कलिंगड, पपई, चिकू व टरबूजच्या स्टॉल्समुळे आठवडी बाजारपेठांना बहर आल्याचे पहायला मिळतेय.

पणजी बाजारात एक लिंबू तब्बल 8 रूपयांना विकला जातोय. 50 रूपयांना 6 लिंबू विकले जात आहेत. कांदा, बटाटा आणि टॉमेटोचे दर मागील महिनाभरापासून स्थिर आहेत पंरतु इतर भाजीपाल्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आले, लसूण, हिरवी मिरची, पालेभाज्या तसेच फळभाज्यांच्या मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याने तुटपुंज्या पगारात सर्वसामान्यांना जीवनावश्‍यक वस्तु खरेदी करणे अन् संसाराचा गाढा चालविणे कठीण होत आहे.

Goa Vegetable Price
Goa Crime Case: थिवी येथील मारहाण प्रकरणातील संशयिताची सशर्त जामीनवर सुटका

उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका करण्यासाठी सध्या नागरिक विविध मार्गाचा अवलंब करत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या कालावधीत फळाचे सेवन जास्त केले जात आहे. मात्र या हंगामात फळांचे दरही वाढल्याचे चित्र दिसू लागलंय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com