North Goa Police
North Goa Police  
गोवा

Sunburn 2022: सनबर्नवर चोर धाडीचा डाव पोलिसांनी उधळला; आंतरराज्य टोळी अटकेत

गोमन्तक डिजिटल टीम

वागातोर येथे बुधवारपासून जगप्रसिद्ध सनबर्न (Sunburn Goa 2022) महोत्सव सुरू झाला आहे. कोरोना संकटानंतर दणक्यात होत असलेल्या या महोत्सवासाठी जगभरातील पर्यटक उपस्थिती लावत आहेत. या महोत्सवात अनेक गैरप्रकार होत असल्याने पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सनबर्नमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी आलेल्या एका आंतरराज्य टोळीचा कट उत्तर गोवा पोलिसांनी (North Goa Police) उधळून लावला आहे.

उत्तर गोवा पोलिसांनी बारा जणांच्या आंतरराज्या टोळीला अटक केली आहे. सनबर्न निमित्त होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरी करण्याचा डाव उत्तर गोवा पोलिसांनी उधळून लावला आहे. त्याच्याकडून तीस लाख रूपये किंमतीचे तब्बल 41 मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय काही प्रमाणात अमली पदार्थ देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, रात्रीच्या संगीतरजनी, रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्जची विक्री तसेच ड्रग्ज सेवन केलेल्या संशयास्पद व्यक्तींची घटनास्थळीच तपासणीसाठी किनारपट्टी परिसरात फॉरेन्सिक लॅब व अंमलीपदार्थविरोधी पथके तैनात केली आहेत. पार्ट्यांचे आयोजन केलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट्सनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई होईल, असा इशारा उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : भाजपमधील मोहरे धोक्यात; लोकसभा निवडणूक निकालानंतर ठरणार नेते-पदाधिकाऱ्यांंचे राजकीय भवितव्य

Panaji News : गोवा घडविण्याची प्रक्रिया अजूनही कायम : राजू नायक

Panaji News : चुकीच्या मानसिकतेचा फेणीला फटका; बारचालकांनी प्रचार, प्रसार करणे गरजेचे

Crime News : गरोदर महिलेला मारहाण, पोलिस स्थानकावर धडक; सखोल चौकशी करण्याची महिलांची मागणी

Goa Rain : कडाक्याच्या उष्म्यावर अवकाळी सरींचा गारवा; १५ मे पर्यंत पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT