New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाला नाव कोणाचे? 'या' नावांची होतेय चर्चा

गोव्यातील दुसऱ्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे आज उद्घाटन होत आहे. सरकारसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते गोव्यात नव्याने उभारण्यात आलेल्या झुआरी नदीवरील पुलाचे आज उद्घाटन होणार आहे. 2,530 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पुलाच्या एका बाजूचे लोकार्पण आज होणार असून, मध्यरात्रीपासून हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. 11 डिसेंबर रोजी मोपा विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन केले होते. त्याच्या 18 दिवसानंतर गोव्यातील दुसऱ्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. सरकारसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

New Zuari Bridge
Durgadas Kamat: सुनावणी रात्री अकरा वाजता! कामत पोहोचलेही पण पुढे काय झाले? तुम्हीच पाहा

मोपा येथील विमानतळाचे (Mopa Airport) नाव काय यावरून गोव्यात बराच वाद झाला. त्यानंतर अखेर पंतप्रधान मोदी यांनी 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे विमानतळाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्या दिवशी देखील विमानतळाबाहेर 'भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती'ने आंदोलन केले होते. दरम्यान, आता आज उद्घाटन होणाऱ्या झुआरी पुलाच्या नावावरून देखील विविध नावांची चर्चा होत आहे. या पुलासाठी गोमन्तकीयांनी विविध नावे सुचवली आहेत.

New Zuari Bridge
South Goa: दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालय 'आजारी', मंजूर झालेल्या 20% जागा भरल्याच नाहीत

कोणत्या नावाची होतेय चर्चा?

झुआरी पुलासाठी प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. एका नेटकऱ्यांने झुआरी पुलाला 'मनोहरसेतू' असे नाव देण्याची मागणी केली आहे. मगोचे नेते सुधीन ढवळीकर यांनी देखील दोनवर्षांपूर्वी हीच मागणी केली होती. काही जणांनी विरोधी पक्षनेते आणि ‘युनायटेड गोअन्स’पक्षाचे दिवंगत नेते जॅक सिक्वेरा यांच्या नावाची देखील मागणी केली आहे. गोवा मुक्ती संग्रामातील अग्रणी नेते राममनोहर लोहिया यांचे नाव देखील झुआरी पुलाला देण्याची मागणी होत आहे.

झुआरी पुलाच्या एका लेनचे आज उद्घाटन होत आहे. मात्र अद्याप पुलाबाबत सरकारकडून किंवा इतर मोठ्या पक्षाची नावासंबधित कोणतीही मागणी समोर आलेली नाही. त्यामुळे पुलाले कोणाचे नाव दिले जाणार? की झुआरी पुल हेच नाव कायम ठेवले जाणार? याबाबत संभ्रम कायम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com