Rama Kankonkar Assault Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठे यश; पाचजणांना अटक, हल्ल्याचे कारण येणार समोर?

Goa Police Arrest 5 Accused: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील सहापैकी पाच आरोपींना पणजी पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या आत अटक केली.

Manish Jadhav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील सहापैकी पाच आरोपींना पणजी पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या आत अटक केली. या धडक कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. या हल्ल्यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक काम करत आहे.

दरम्यान, ही धक्कादायक घटना गुरुवारी (18 सप्टेंबर) पणजीजवळील कारांझळे येथे घडली. सामाजिक कार्यकर्ते सोयरु वेळिप यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सहा अज्ञात आरोपींनी रामा काणकोणकर यांना एका ठिकाणी बेकायदेशीरपणे डांबून ठेवले आणि प्राणघातक शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच, आरोपींनी वेळिप यांनाही धमकावले होते. या हल्ल्यात काणकोणकर गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे

घटनेची माहिती मिळताच पणजी (Panaji) पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. या प्रकरणातील गुंतागुंत आणि आरोपींची संख्या लक्षात घेता पोलिसांनी वेगाने पावले उचलली. तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये आरोपींची ओळख पटवणे पोलिसांना शक्य झाले, ज्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळाली. फुटेजच्या आधारे आरोपींचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आणि पोलिसांनी तातडीने वेगवेगळ्या पथकांना कारवाईसाठी रवाना केले.

आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न निष्फळ

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोव्यातून (Goa) बाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते. या माहितीवर विश्वास ठेवून पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले. पोलिसांच्या एका पथकाने दोडामार्गजवळ (Dodamarg) तपासणी केली, जिथे त्यांना आरोपी अँथनी नादर आणि फ्रान्सिस नादर यांना पकडण्यात यश आले. हे दोघेही गोव्याच्या सीमेवरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.

त्याचवेळी, पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने मडगाव रेल्वे स्थानकावर धडक दिली. तिथे त्यांना आणखी तीन आरोपी, सुरेश नाईक, मिंगेल आरौजो आणि मनीष हडफडकर यांना पकडण्यात यश आले. हे तिघेही ट्रेन पकडून राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले हे पाचही आरोपी हिस्ट्री-शीटर आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. यावरुन हा हल्ला पूर्वनियोजित आणि गंभीर होता, हे स्पष्ट होते. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

या हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके सातत्याने त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या कारवाईमुळे गोव्यातील गुन्हेगारांना एक स्पष्ट संदेश गेला आहे की, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे राज्यात खपवून घेतले जाणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT