CM Pramod Sawant Orders Strict Action
CM Pramod Sawant Dainik Gomantak

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

CM Pramod Sawant Orders Strict Action: गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर गुरुवारी (18 सप्टेंबर) दुपारी अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली.
Published on

Rama Kankonkar Assault: गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर गुरुवारी (18 सप्टेंबर) दुपारी अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. सहा अज्ञात व्यक्तींनी मिळून काणकोणकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय नेत्यांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यातच आता, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे.

त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'अशा घटना राज्यात कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत.' दोषी असलेल्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

CM Pramod Sawant Orders Strict Action
Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आणि पोलिसांचा तपास

मुख्यमंत्री सावंत यांनी या घटनेनंतर तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना हल्लेखोरांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सावंतांनी आश्वासन दिले की, रामा काणकोणकर यांना पूर्णपणे संरक्षण दिले जाईल. "राज्यातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या मतामुळे किंवा कार्यामुळे भीती वाटण्याचे कारण नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या हल्ल्यामुळे गोव्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरु झाली असून पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

CM Pramod Sawant Orders Strict Action
Rama Kankonkar: ''राखणदाराच्या जागेबद्दल बोलणारे तुम्ही कोण''? आक्रमक प्रश्न करणाऱ्या रामा काणकोणकरला न्यायालयाचा दिलासा

रामा काणकोणकर हे गोव्यातील (Goa) अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर निर्भीडपणे आपली भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. ते अनेकदा सरकारी व्यवस्थेतील गैरव्यवहारांवर, पर्यावरणाच्या समस्यांवर आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतात. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनहितासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे काही शक्तिशाली व्यक्ती किंवा गटांचे हितसंबंध दुखावल्याची शक्यता आहे. यापूर्वीही, त्यांना धमक्या मिळाल्याचे बोलले जाते. हा हल्ला त्यांच्या सामाजिक कार्याचाच परिणाम असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com