Goa Police Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: दोन सरकारी कर्मचाऱ्यांसह 33 जणांना अटक; राजकीय कनेक्शनबाबत गोवा पोलिसांनी केला महत्वाचा खुलासा

Goa Police: राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणाचीच चर्चा सुरु आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला.

Manish Jadhav

पणजी: 'कॅश फॉर जॉब' प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत 33 जणांना अटक केली असून दक्षिण गोव्यातून सर्वाधिक 20, तर उत्तर गोव्यातून 13 संशयितांना अटक केली आहे. आज (16 नोव्हेंबर) दोन्ही जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेवून या प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा लेखाजोखा मांडला.

या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली, परंतु पोलिसच या प्रकरणाची सखोल चौकशी करतील अशी भूमिका सावंत सरकारने मांडली. याच पार्श्वभूमीवर आज (16 नोव्हेंबर) दोन्ही जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेवून या प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा लेखाजोखा मांडला. राज्यात आतापर्यंत 33 जणांना अटक करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दक्षिण गोव्यातून 20 जण अटकेत

दक्षिण गोव्याच्या एसपी सुनिता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅश फॉर जॉब प्रकरणात दक्षिण गोव्यात आतापर्यंत 12 प्रकरणांची नोंद झाली असून 20 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या 20 जणांमध्ये दोन सरकारी अधिकारी आहेत. मात्र अद्याप या प्रकरणात कोणत्याही प्रकराचे राजकीय कनेक्शन समोर आलेले नाही.

उत्तर गोव्यातून 13 जणांना अटक

उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी उत्तर गोव्यात 17 प्रकरणांची नोंद झाली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रिया यादव प्रकरणातून 116 ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती कौशल यांनी दिली. तसेच, डिचोलीत एका प्रकरणात एका पोलिस कॉन्स्टेबलचे नाव पुढे आले असून त्याला तात्काळ निलंबित केल्याचेही कौशल यांनी सांगितले.

राजकीय घमासान

राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणाचीच चर्चा सुरु आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी रोज नव-नवे खुलासे होत आहेत. सावंत सरकारमधील मंत्री, आमदार यांचा प्रकरणात हात असल्याचा घणाघात विरोधकांकडून करण्यात आला.

या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली, परंतु पोलिसच या प्रकरणाची सखोल चौकशी करतील अशी भूमिका सावंत सरकारने मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

Goa News: 28 गुन्ह्यांचे अपराधीकरण झाले रद्द! गोवा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तुरुंगवासाऐवजी दंडाची तरतूद

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Horoscope: प्रवास, संधी आणि नवीन दिशा! विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम; व्यवसायिक लाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT