Goa PF Registration Dainik Gomantak
गोवा

Goa PF Registration: सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 2,220 जणांना पीएफ आणि विमा योजनेचा लाभ

Goa Contractual Employees PF Benefits: चालू वर्षात ज्या २,२२० कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळाला आहे, त्यात सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (पीएफओ) गोवा कार्यालयाने सरकारी तसेच खासगी अशा मिळून २०५ आस्थापनांतील २,२२० कर्मचाऱ्यांची ‘पीएफ’मध्ये नोंदणी करून त्यांना भविष्य निर्वाह निधी बचत आणि नियोक्ता निधी संलग्न विमा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.

चालू वर्षात ज्या २,२२० कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळाला आहे, त्यात सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती ‘पीएफओ’च्या गोवा कार्यालयाचे आयुक्त सचिन शेट्टी यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. अभियानाचा भाग म्हणून ‘पीएफओ’ने व्यापक सहभागासाठी नियोक्त्यांना विशेष सवलती दिल्या होत्या. गेली काही वर्षे ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ‘पीएफ’ची रक्कम वजा करण्यात आलेली नाही, अशा पात्र कर्मचाऱ्यांची नावे नोंदवण्यासाठी नियोक्त्यांना ‘पीएफ’मधील स्वतःचे योगदान न देण्याची सवलत देण्यात आली होती.

कलम १४ ‘ब’ अंतर्गत आकारण्यात येणारी दंडाची रक्कमही सर्व योजनांचा समावेश करून प्रतिआस्थापना १०० रुपये इतकी कमी करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांची नावे जाहीर केलेले अथवा या अभियानांतर्गत नव्याने नोंदणी केलेले नियोक्तेही प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पात्रता निकषांच्या अधीन राहून या सवलतीचा लाभ घेण्यास पात्र ठरले.

दोन वर्षांत ४,९२० जणांना फायदा

गोवा कार्यालयाने गतवर्षीही हे अभियान राबवले होते. त्यावेळी सुमारे २,७०० कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’चा लाभ मिळवून देण्यात आला होता. यंदा २,२२० जणांना हा लाभ मिळाला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत सरकारी तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या गोव्यातील ४,९२० जणांना ‘पीएफ’ कार्यालयाने दिलासा मिळवून दिला, असेही शेट्टी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: लाचखोरी, कोठडीतील मारहाण ते लैंगिक अत्याचाराचे आरोप; गोव्यात 10 महिन्यांत 26 पोलिस निलंबित!

8th Pay Commission Latest Update: आठव्या वेतन आयोगाला एक वर्ष पूर्ण; रिपोर्ट कधी येणार अन् कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात लाभ कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण टाइमलाइन

Daily Protein Requirement: रोज किती प्रोटीन खाणं आवश्यक? वयानुसार ठरते शरीराची गरज; 30 किलो वजन असल्यास किती ग्रॅम प्रोटीन घ्यावे?

Goa Agriculture: काटेकणगीच्या शेतीला ग्रहण! लागवड वाढली, तरी उत्पादन घटले; दिवाळीच्या मागणीवर परिणाम होणार?

Goa Weather: दिवाळी तोंडावर पावसाचा जोर कायम; डिचोलीत घरावर कोसळली आंब्याची फांदी, बाजारपेठेत धावपळ!

SCROLL FOR NEXT