Pernem Theft, Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: रात्री दुकान फोडून घुसले चोरटे, हाती लागली फक्त चिल्लर, कोल्ड्रिंक पिऊन पळाले; पेडण्यात चोरांची झाली फजिती

Pernem Theft: पावसाचा फायदा घेऊन चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे. मात्र, या चोऱ्यासंबंधी कुणीही दुकानमालकांनी पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविलेली नाही, हे विशेष.

Sameer Panditrao

पेडणे: मोठा हात मारण्याच्या इराद्याने आलेल्या चोरांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणची दुकाने हेरून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती केवळ चिल्लर लागली.

नानेरवाडा - पेडणे येथे सोमवारी रात्री एकाच ठिकाणी असलेल्या दोन दुकानांमध्ये या चोरांनी प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती ठोस काही न लागल्याने त्यांनी तेथील सुट्या पैशांची चिल्लर चोरून नेली. यापैकी एका दुकानात चोरांनी पेप्सी कोला पिऊन रिकामी बाटली टेबलवर ठेवली. मात्र, हाती आणखी काही न लागल्याने त्यांनी पलायन केले.

याच रात्री चोरांनी न्हयबाग येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन ट्रकच्या बॅटऱ्या चोरून नेल्या. रात्री सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेऊन चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे. मात्र, या चोऱ्यासंबंधी कुणीही दुकानमालकांनी पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविलेली नाही, हे विशेष.

चिंचिणीमध्ये मौल्यवान ऐवज लंपास

दादेवाडो-चिंचिणी येथील एका बंद घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. चोरांनी घरात घुसून चार कपाटे फोडली आणि कांस्य, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. संबंधित ग्रामस्थांनी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chorla Belgaum Road: चोर्लाघाट–बेळगाव रस्ता धोकादायक! खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था; कर्नाटकचे निकृष्ट काम

Russia Ukraine War: 8 जणांचा मृत्यू , 55 जखमी! युक्रेनवर रशियाचे पुन्हा ड्रोनहल्ले; 100 इमारतींचे नुकसान

Goa Politics: 'लोकांसाठी शांतपणे कार्यरत राहणे हे माझे धोरण'! मंत्री कामतांचे प्रतिपादन; खात्यांना न्याय देण्याचे दिले आश्वासन

Goa Politics: तवडकर, कामत यांना खातेवाटप, मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची जबाबदारी; कोणाकडे कोणती खाती? वाचा संपूर्ण यादी..

Goa Rain: पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी! ऐन चतुर्थीत पावसाचा धुमाकूळ; डिचोली, सत्तरी, सांगे भागांतील नद्यांना पूर

SCROLL FOR NEXT