Sawantwadi Theft: चोरट्यांचा धुमाकूळ! गोव्यात टॅक्सीचालकावर खुनी हल्ला, सावंतवाडीत घरफोडीसह दुचाकी-मोबाईलची चोरी

Goa Crime: चोरट्यांना पकडण्यासाठी गोवा व सावंतवाडी पोलिसांनी शहरामध्ये संयुक्त शोधमोहीम राबवली. मात्र, चोरटे पळून गेले आहेत. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Sawantwadi Theft
Car TheftDainik Gomantak
Published on
Updated on

सावंतवाडी: शहरामध्ये बुधवारी (ता. ९) रात्री पाच ते सहा चोरट्यांनी धुडघूस घालत चोरीचा प्रयत्न केला. याच चोरट्यांनी गोवा-कळंगुट येथील टॅक्सीचालकावर पेडणे मालपे येथे प्राणघातक हल्ला केला आणि तीच टॅक्सी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने पलायन केले होते, अशी माहिती गोवा पोलिसांकडून येथील पोलिसांना मिळाली. सावंतवाडीत या चोरट्यांनी घरफोडी, दोन मोबाईल व दोन दुचाकींची चोरी करत कणकवलीच्या दिशेने पलायन केले.

या चोरट्यांना पकडण्यासाठी गोवा व सावंतवाडी पोलिसांनी शहरामध्ये संयुक्त शोधमोहीम राबवली. मात्र, चोरटे पळून गेले आहेत. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कळंगुट येथील टॅक्सीचालकाला सावंतवाडीपर्यंत भाडे आहे, असे सांगून चोरट्यांनी टॅक्सी नोंद केली. यानंतर त्यांनी रात्री उशिरा मालपे पेडणे येथे त्या टॅक्सीचालकावर जीवघेणा हल्ला करत चालकाला बाहेर फेकले.

त्यानंतर चोरटे टॅक्सीने सावंतवाडीच्या दिशेने पसार झाले. या घटनेची माहिती गोवा पोलिसांना मिळताच त्यांनी संपूर्ण राज्यात नाकाबंदी केली; मात्र, ते आढळून आले नाहीत. त्यामुळे गोवा पोलिसांचे एक पथक मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून चोरट्यांचा

माग काढत थेट सावंतवाडीत आले. चोरट्यांना याची चाहूल लागताच त्यांनी टॅक्सी मध्येच कुठेतरी सोडली व वेगवेगळे झाले. ती टॅक्सी त्यांनी कुठे सोडली, याचाही शोध सुरु आहे.

त्यानंतर त्या चोरट्यांनी सावंतवाडीमध्ये चोरीचा धुमाकूळ घातला. त्यांनी सावंतवाडीतील खासकिलवाडा परिसरात दोन दुचाकी चोरून नेल्या. यात शहरातील हेल्थ पार्कच्या परिसरातील मिनल भिरमुळे यांची दुचाकी तर तेथेच झोपलेल्या दोघां कामगारांचे मोबाईल चोरून नेले.

ज्युस्तीनगर येथील पावलीन रॉड्रिग्स यांची दुचाकी अशा दोन दुचाकी चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले आहे. याच दरम्यान चोरट्यांनी शहरातील जेलजवळील एका बंगल्यामध्ये चोरीचा प्रयत्न केला.

मात्र, त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काही लागले नाही. आज सकाळी संबंधित चोरट्यांनी चोरलेली एक दुचाकी कणकवली सावडाव येथे आढळून आली असून दुसऱ्‍या दुचाकीचा शोध सुरू आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी सायंकाळी घटनास्थळांना भेट देऊन पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली.

सहा व्हॅनमधून गोव्याचे पथक

एकूणच मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत सावंतवाडी शहरांमध्ये गोवा आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. यामध्ये गोवा पोलिसांच्या तब्बल सहा पोलिस व्हॅन सावंतवाडीत दाखल झाल्या होत्या. तलावाकाठी तसेच शहरातील विविध परिसरामध्ये चोरट्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्यात त्या चोरट्यांना यश आले.

Sawantwadi Theft
Colva Theft: कार धुवून देतो म्हणून गेला, आणि झाला गायब! कोलवा येथील घटना; कर्नाटकात सापडली गाडी, चोरटा मात्र बेपत्ता

गोव्यात एकजण ताब्यात

पोलिसांनी शहरातील खासगी तसेच शासकीय सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी गोव्यात एकाला अटक केली असून, तो अल्पवयीन असल्याचे समजते.

Sawantwadi Theft
Sanquelim Temple Theft: साखळी देवस्‍थानात चोरी नाहीच! शास्त्रानुसार मुर्त्या विसर्जित; पदाधिकाऱ्यांचे मामलेदारांवर आरोप

पोलिस अधीक्षकांच्या सूचना

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी रात्री साडेआठच्या सुमारास सावंतवाडी पोलिस ठाण्यात येत तपासाबाबत सूचना केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com